बीड (रिपोर्टर): पांगरी रोडवर एका वस्तीवर राहणार्या 35 वर्षीय तरुणाने आज पहाटेच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली. सदरील तरुणाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
चंद्रकांत बंडु दिंडे (वय 35 वर्षे, रा.पांगरी रोड) या तरुणाने आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. मृतदेहावर जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.








