
स्कुटी रस्त्याच्या कडेला उभी करून शेतकर्याच्या गोठ्यात घेतली फाशी
लातूर/अंबाजोगाई (रिपोर्टर): लातूर शहरानजीक असलेल्या पेठशिवार भागातील एका शेतातील गोठ्यामध्ये तरुण-तरुणी गळफास घेऊन लटकलेल्या स्थितीत शेत मालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तात्काळ लातूर ग्रामीण पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. अन्य शोधाशोध सुरू केली तेव्हा त्यांच्याकडे मिळालेल्या आयकार्डवरून हे दोघेही अंबाजोगाई तालुक्यातील दरडवाडी येथील असल्याचे दिसून आले. यातील तरुणी ही एमआयटी कॉलेज लातूर याठिकाणी स्टाफ नर्स म्हणून काम करत असल्याचेही उघड झाले असून दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक असेकी, लातूर शहरानजीक असलेल्या पेठ शिवार भागातील एका शेतकर्याच्या शेतात असलेल्या गोठ्यामध्ये दोन युव-युवतीचे मृतदेह फाशी घेतलेल्या स्थितीत शेत मालकाच्या दृष्टीस पडले. त्याने तात्काळ ग्रामीण पोलिसांना घटनेची माहिती दिली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या वेळी हे दोघे एका स्कुटीवरून आले होते. त्यांनी ती शेता शेजारच्या रस्त्यावर लावली होती. अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता हे दोघे अंबाजोगाई तालुक्यातील दरडवाडी येथील असून यातील मयत नितीन संदीपान दराडे याचे वय 29 वर्षे तर राणी मालबा दराडे हिचे वय 24 वर्षे आहे. राणी ही लातूरच्या एमआयटी कॉलेजमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करते. पंचनाम्या दरम्यान त्यांच्या जवळ दोन मोबाईल मिळून आले. ते तेव्हा बंद होते. पोलिसांनी मोबाईल चालू केले असता त्यावर त्यांच्या घरच्यांचे फोन आले तेव्हा मयतांची ओळख पटवत नातेवाईकांना घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. दोघांचे पार्थीवदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.








