
वाळू घेवून जाणारे दोन वाहने पकडले
बीड, (रिपोर्टर)ः- नदीतील पाणी कमी होताच वाळू माफिया नदीमधील वाळू उपसू लागले. आष्टी तालुक्यातील अंमळनेर शिवारातील नदी पात्रातून वाळू घेवून जाणार्या दोन वाहनांना पोलिसांनी पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अंमळनेर शिवारातील मुकगाव शिवारातून अमन आदम शेख (रा.खडकत) हा ट्रकमध्ये वाळू घेवून जात असल्याचे पोलिसांना कळाल्यानंतर पोलिसांनी सदरील हा ट्रक ताब्यात घेतला व त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. दुसरी घटना जोगदंड वाडी फाट्याजवळ घडली. अमोल भिमराव सोनवणे (वय 34) हा ट्रकमध्ये तीन ब्रास वाळू घेवून जात असल्याचे निदर्शनास आले. त्यालाही अंमळनेर पोलिसांनी पकडले आहे. या दोघाजणाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








