
70 हजारांचा ऐवज पळवला
बीड, (रिपोर्टर)ः- पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या ईट फाटा येथील ग्राहक सेवा केंद्रात चोरी झाली असून चोरट्यांनी कॉम्प्युटर सेट व इतर साहित्या चोरून नेले. त्याच बरोबर गंगनाथवाडी येथे एका घरात चोरी झाली. चोरट्याने एकूण 70 हजारांचा ऐवज चोरून नेला.
ईट फाटा येथे असलेल्या ग्राहक सेवा केंद्राचे कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. आतील कॉम्पयुटर सेट व इतर साहित्य चोरून नेले तसेच गंगनाथवाडी येथील रामभाऊ चांदणे यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिणे असा एकूण 70 हजारांचा ऐवज नेला आहे. या प्रकरणी परमेश्वर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








