
आठ जणांविरोधात गुन्हा दाखल, चकलांबा येथील घटना
गेवराई, (रिपोर्टर)ः- आमच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल का केली या कारणावरून एकास पाच ते सहा जणांपेक्षा जास्त लोकांनी चाकूने मारहाण करून गंभीररित्या जखमी केले आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जावेद जब्बार सय्यद (रा.चकलांबा ता.गेवराई) यास जावेद शेख जैद सय्यद, साद सय्यद आणि साहिल शेख यानी मारहाण केली या प्रकरणी आठ आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाला. चाकून मारहाण केल्यामुळे जावेद सय्यद हा गंभीर जखमी झाला. सदरील हा मारहाणीचा प्रकार तक्रार देण्याच्या कारणावरून घडला आहे.









