
फुले पिंपळगाव येथील घटना
बीड (रिपोर्टर):- माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील एका शेतकर्याने शेतातून काढलेली सोयाबीन एकत्र करून शेतामध्येच झाकून ठेवली होती. अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री ही सोयाबीन जाळून टाकली असल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे शेतकर्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला सदरील शेतकरी व बीड न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असणारे अँड. सुरेश सोपानराव साळवे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीत असे म्हटले आहे की, माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव शिवारात गट नं.260 मध्ये एकुण दिड एकर जमिन आहे.याठिकाणी सोयाबिन पिकांच्या 3 बँगची पेरणी केली होती. यापैकी दोन बँगच्या पिकाची कापणी करुन याच शेतात सोयाबीन झाकून ठेवली होती.
दिनांक 23 ऑक्टोबरच्या मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने एकत्र करून व नीटनेटकी झाकून संपूर्ण सोयाबीनला जाळून टाकल्याची प्रकार घडला आहे. ही घटना सकाळी फिर्यादींची बहीण पुष्पा साळवे या शेतात गेल्यानंतर त्यांना समजली. यानंतर त्यांनी भाऊ अडवोकेट सुरेश साळवे यांना कळवले असता. फिर्यादी अडवोकेट सुरेश सोपानराव साळवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व सदरील संपूर्ण सोयाबीन अज्ञात व्यक्तीने जाळून टाकल्याचा प्रकार दिसला त्यानंतर साळवे यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन जाऊन अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.








