
बीड (रिपोर्टर): स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीमध्ये महायूती एकत्रितपणे निवडणूक लढविण्याच्या विचारात आहे मात्र जर महायूती झाली नाही तर आम्ही स्वतंत्र लढणार असल्याचे शिवसेनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक पटवर्धन, बीड संपर्क प्रमुख मोरे यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने अशोक पटवर्धन, मोरे हे कालपासून बीड जिल्ह्यामध्ये आलेलेआहेत. त्यांनी गेवराई, धारूर, माजलगाव या नगरपालिकेचा आढावा घेतला आज दुपारी त्यांनी बीड येथील शिवसेना कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना पटवर्धन, मोरे म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत महायूती करून निवडणूकीला आम्ही सामोरे जाणार आहोत मात्र महायूती झाली नाही तर स्वतंत्र लढण्याची आमची तयारी आहे. आज परळी, अंबाजोगाई येथील नगरपालिकेचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, चंद्रकांत नवले, स्वप्नील गलधर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.









