
हे मंत्री पद माझ्यासाठी नव्हे तर जनतेसाठी-पंकजा मुंडे
परळी, (रिपोर्टर)ः- हा दिवाळीचा कार्यक्रम असला तरी हा कार्यक्रम अराजकीय नाही असं म्हणत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यात महायुती झाली आणि आपल्याला आज पर्यंत ज्यांच्या सोबत संघर्ष झाला त्यांच्यासोबत काम करावे लागत आहे. पाच वर्षे कोणत्याही पदावर नसतांना अल्पशामताने आपल्या पराभव स्विकारावा लागला. चांगल्या, वाईट काळामध्ये तुम्ही मला साथ दिली, तुम्ही मला भाऊबीज दिली, तुम्ही मला ओवाळणी दिली म्हणून तुम्हाला थॅक यू म्हणायचं आहे. तेवढ्यासाठीच या ठिकाणी तुम्हाला बोलवलं असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हंटलं.
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आज परळीमध्ये दिपावली निमित्त स्नेहभेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मतदारसंघासह जिल्हाभरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मुंडेंवर प्रेम करणारे लोक उपस्थित होते. या वेळी व्यासपिठावर माजी खा.प्रितम मुंडे, माजी आ.केशव आंधळे, बाळराजे पवार, अक्षय मुंदडा, बदामराव पंडित, माधव निर्मळ यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. प्रितम मुंडे यांचे भाषण झाल्यानंतर पंकजा मुंडे भाषणासाठी उठल्या सुरूवातीला त्यांनी हा कार्यक्रम दिपावली निमित्त आहे, मात्र अराजकीय नाही. मला काही लपवता येत नाही, खोटं बोलता येत नाही. आजपर्यंत ज्यांच्या सोबत आपला संघर्ष झाला त्यांच्यासोबत आता आपण काम करत आहोत. वरच्या पातळीवर मोठी महायुती झाली.
मधल्या काळात कुठलेही पद आपल्याकडे नव्हतं अशा स्थितीत आपण लोकसभा निवडणूक लढविली. एकीकडे मोठ मोठ्या मताने त्यावेळी अनेकांचा पराभव झाला. मात्र आपला छोट्याशा मताने पराभव झाला. तुम्ही माझा परिवार आहात, हे मी मनातून सांगते. मुंडे साहेब असतांनी मला आमदारकी दिली, त्यांनी माझ्या पाठीवर थाप दिली हे आता सांगायची गरज नाही. आज तुम्हाला एवढ्यासाठीच बोलावलं आहे. तुम्हाला मला थॅक यू म्हणायचं आहे. तुम्ही मला भाऊबीज दिली, ओवाळणी दिली, चांगल्या वाईट काळात साथ दिली. त्यामुळे तुम्हाला मी थॅक यू म्हणते.विधानसभेमध्ये मी युती धर्म पाळला. मला मिळालेलं मंत्री पद हे माझ्यासाठी नाही तर जनतेसाठी आहे असं ही पंकजा यावेळी म्हणाल्या. वेळेअभावी पंकजा मुंडे यांनी संपूर्ण भाषण देता येत नाही. त्याचं भाषण सुरू होते.
बाळराजे, बदामराव एकाच व्यासपिठावर
गेवराईच्या राजकारणाला कलाटणी देणारे संकेत गेल्या काही दिवसापुर्वी पासून पहावयास मिळत आहेत. बाळराजे पवार हे राजकारणात सक्रीय होतांना दिसून येत आहेत तर दुसरीकडे माजी मंत्री बदामराव पंडित भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. आज पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत परळीत जो कार्यक्रम होत आहे. त्या कार्यक्रमाला व्यासपिठावर बदामराव पंडित आणि बाळराजे पवार हे उपस्थित असल्याचे दिसून आले.









