• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

दिवाळीच्या गोडव्याला स्वतंत्र लढण्याची फोडणी

by गणेश सावंत
October 27, 2025
Reading Time: 2 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


शिंदेंच्या शिवसेनेने हाबूक ठोकला; पंकजा म्हणाल्या काही ठिकाणी युती होणार नाही;
अजितदादांची राष्ट्रवादी निवडणूक लढविण्यासाठी आक्रमक; शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या हालचाली;
ठाकरेंची सेना मात्र शांत; काँग्रेसकडून लढण्याचा आव


बीड(रिपोर्टर): राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या बीड जिल्ह्यात महायूती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत होईल असे वाटत असतांनाच महायूतीत तीनही महत्त्वकांक्षी पक्ष स्वबळावर लढण्याचा नारा देताना दिसून आले आहे. काल परळीतल्या स्नेहमिलनात भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या तथा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी कुठे यूती तर कुठे यूती होणार नसल्याचे सांगून स्वतंत्र लढण्याचे संकेत दिले. तर इकडे शिंदेंेच्या शिलेदारांनी जाहीर पत्रकार परिषद घेत स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहा असा शिवसैनिकांना संदेश दिला. अजितदादांची राष्ट्रवादी बीड जिल्ह्यात मजबूत असल्याने ती स्थानिक स्वराज्यच्या निवडणूका लढविण्यासाठी ठिकठिकाणी सज्ज असल्याचे पहावयास मिळत आहे. महायूतीतले तीनही पक्ष स्वबळाचा नारा देताना दिसून येत असतांना इकडे महाविकास आघाडीतील शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी तयारी करताना दिसून आली. ठाकरेंच्या शिवसेनेकडून मात्र अद्याप कुठल्याच हालचाली बीड जिल्ह्यात पहावयास मिळत नाहीत. काँग्रेस नेहमीप्रमाणे बीड जिल्ह्यात ऊसना आव आणू पाहत आहे. दिवाळीच्या गोडव्याला स्वतंत्र लढण्याची फोडणी जिल्ह्यात राजकीय नेत्यांकडून दिली जात आहे.


निवडणूका कुठल्याही असो त्या अत्यंत चित्तथरारकपणे लढवणे आणि अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष जिल्ह्याकडे वेधून घेणे ही खासीयत बीडच्या नेत्यांसह लोकप्रतिनिधींमध्ये सातत्याने पहावयास मिळते. येत्या काही दिवसात नगर पालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. त्या अनुषंगाने राज्यात महायूती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होईल अशी अपेक्षा असतांना बीड जिल्ह्यात मात्र महायूतीतले तीनही पक्ष  स्वतंत्र लढण्याच्या तयारीत दिसून येत आहेत. काल परळी येथे भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा स्नेहमिलनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडेंनी हा राजकीयच कार्यक्रम आहे असे ठामपणे सांगत  आगामी निवडणूकांमध्ये कुठे यूती होईल कुठे होणार नाही, आपण आपलं काम करत राहायचं असा संदेश कार्यकर्त्यांना देत स्वतंत्र लढण्याबाबतचे संकेत दिले.

दुसरीकडे शिंदे सेनेचे संपर्क प्रमुख पटवर्धन आणि मोरे हे दोघे बीडमध्ये डेरेदाखल झाले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेवून महायूती झाली नाही तर स्वतंत्र लढणार असे सावध वक्तव्य केले असले तरी स्थानिक स्वराज्यसाठी स्वतंत्रपणे लढता यावं याची पुर्ण तयारी केल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पंचायत समितीच नव्हे तर बीडच्या नगर परिषदेसाठीही आमच्याकडे उमेदवार असल्याचे त्यांच्या जिल्हा प्रमुखांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगून टाकून शिंदेंची शिवसेना ही स्वतंत्र लढण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले. अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बीड जिल्ह्यावर अधिक वर्चस्व आहे. गेल्या काही महिन्यापासून नगर पालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती लढण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे प्रचंड इच्छूकांचा भरणा आहे. ते तर स्वतंत्र लढणार यापेक्षा अजितदादांच्या राष्ट्रवादीला बंडखोरांचाही सामना करावा लागतो की काय? अशी स्थिती सध्या जिल्ह्यात पहावयास मिळते. महायूतीतील तीनही पक्ष आपली ताकद दाखविण्याच्या तयारीत आहे. तर महाविकास आघाडी मात्र बीड जिल्ह्यात चाचपणी करताना दिसून येते. शरद पवारांची राष्ट्रवादी प्रत्येक ठिकाणी आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. ठाकरेंची शिवसेना मात्र अद्याप शांत असून काँग्रेस पक्ष उसना आव आणण्याच्या प्रयत्नात आहे. येथे स्थानिक स्वराज्य निवडणूकीत महाविकास आघाडी यूतीच्या तयारीत दिसून येते. दिवाळीचा गोडवा संपल्यानंतर आता निवडणूक लढवण्याबाबत ठिकठिकाणी चर्चेची फोडणी दिली जात असल्याचे दिसून येत असून उद्याच्या निवडणूकीकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Previous Post

डॉ.संपदा मुंडे संशयित खून खटला बीड न्यायालयातच चालवावा- बाबुराव पोटभरे

Next Post

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची केली शिफारस

संबंधित बातम्या

अग्रलेख

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

by गणेश सावंत
July 5, 2026
अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची केली शिफारस

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?