• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

डोंगरेवाडीच्या पाझर तलावात महिलेचा आढळला मृतदेह

by गणेश सावंत
October 28, 2025
Reading Time: 3 mins read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp


आत्महत्या की हत्या; खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी
वडवणी पोलीस स्टेशनसमोर ठेवला मृतदेह
शवविच्छेदनचा अहवाल आल्यानंतर प्रकरणाचा उलगडा होणार


वडवणी , (रिपोर्टर)ः- खंडोबाचीवाडी येथे मुलीला भेटण्यासाठी आलेल्या महिला घरी जाते म्हणून शेतातुन पुढे आली मात्र घरी न पोहोचल्याने हरवल्याची तक्रार दाखल केली मात्र दुसर्‍याच दिवशी डोंगरेवाडी पाझर तलावात तरंगताना महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान महिलेने आत्महत्या केली की हत्या? झाली. या घटनेने खळबळ उडाली असून महिलेच्या कुटुंबीयांनी खुनाचा खुना दाखल करण्याची मागणी केली तर रात्री मृतदेह वडवणी पोलिस स्टेशनच्या गेटसमोर ठेवून ठिय्या मांडला होता.


वडवणी तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथे मुलीला भेटण्यासाठी आशाबाई प्रल्हाद करांडे वय 57 वर्ष रा. पिंपळनेर ता.जि. बीड या आल्या होत्या. शुक्रवार दि.24 ऑक्टोबर रोजी स्वताच्या मुलीसोबत शेतात बाजरी मोडायला गेल्या होत्या दिवसभर काम केल्यानंतर मुलगी शेतात राहिली व मयत आशाबाई करांडे या एकटीच घराकडे येण्यासाठी निघाल्या मात्र घरी पोहोचल्या नसल्याने धावपळ झाली. सर्व नातेवाईकांना चौकशी केली मात्र कुठेही आढळुन न आल्याने हरवल्याची तक्रार जावयाच्या फिर्यादीवरून वडवणी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र रविवार दि. 26 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास डोंगरेवाडी पाझर तलावात तरंगताना त्या महिलेचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. महिलेच्या साडीला व कमरेला मोठा दगड बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळला असल्याने संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

वडवणी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत पंचनामा केला व मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल केला होता मात्र शवविच्छेदन झाल्यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी महिलेचा खुन झाला असल्याचा आरोप केला असुन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असुन आक्रमक पवित्रा घेत मृतदेह वडवणी पोलीस स्टेशन समोर ठेवला असुन गुन्हा दाखल करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला असल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शवविच्छेदनचा अहवाल येताच या घटनेचा उलगडा होणार आहे.


खुनाचा गुन्हा दाखल करा; कुटुंबीयांची मागणी
डोंगरेवाडी पाझर तलावात संशयास्पद महिलेचा मृतदेह आढळला असून महिलेच्या कंबरेला व साडीला मोठा दगड अंदाजे 40 किलो वजनाचा दगड बांधण्यात आला आहे. व शरिरावर जळलेल्याच्या खुना असल्याने ही आत्महत्या नसून हा खुण असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असुन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांना केली आहे. आदी गुन्हा दाखल कर मंगच अंत्यविधी करु असा आक्रमक पवित्रा कुटुंबियांनी घेतल्याने तणावाचे वातावरण होते. मात्र शेवटी संशयितावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.


डीवायएसपी शैलेश गायकवाड यांनी पोलीस स्टेशनला दिली भेट
महिलेचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने वडवणी पोलीस स्टेशनला उपविभागीय पोलिस अधिकारी माजलगाव शैलेश गायकवाड यांनी भेट देत घटनेची माहिती घेतली. योग्य ते कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.


तपास सुरू आहे – वर्षा व्हगाडे
 आम्ही मध्यस्थी केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी घेऊन गेले आहेत. यानंतर वरिष्ठ पातळीवरील अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेऊन सदरील घटनेचा तपास सुरू आहे. याचा तपास पूर्ण झाल्यानंतर सत्य काय ते बाहेर येईलच अशी प्रतिक्रिया वडवणी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी रिपोर्टरशी बोलताना दिली आहे.

Previous Post

सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची केली शिफारस

Next Post

सीसीआय राज्यात दिडशे हमीभाव केंद्र सुरू करणार

संबंधित बातम्या

कटाक्ष

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

by गणेश सावंत
August 22, 2026
क्राईम

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

by गणेश सावंत
August 21, 2026
कटाक्ष

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

by गणेश सावंत
August 21, 2026
क्राईम

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

by गणेश सावंत
August 20, 2026
कटाक्ष

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

by गणेश सावंत
August 19, 2026
Next Post

सीसीआय राज्यात दिडशे हमीभाव केंद्र सुरू करणार

ताज्या बातम्या

प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?

August 22, 2026

मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग

August 21, 2026

कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

August 21, 2026

अविनाश पाठक यांचा नियमितनंतर डिफॉल्ट जामीन अर्जही फेटाळला २० ऑगस्टपर्यंत न्यायालयाकडून जामीन मंजूर नाही; दोन्ही अर्जांना न्यायालयीन स्तरावर नकार

August 20, 2026

कटाक्ष/“मोदी है तो मुमकीन है”
शिवरायांच्या भुमीत
निसर्गाचा सौदा!“मोदी है तो मुमकीन है”शिवरायांच्या भुमीतनिसर्गाचा सौदा!

August 19, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • प्रत्येक विद्यार्थी हा अधिकारी होत नसतो परंतु प्रत्येक अधिकारी हा विद्यार्थी असतो’कटाक्ष/व्यवस्थेचे गुलाम का होता?
  • मोठी बातमी/ वडवणी येथे दोन गटात तुफान दगडफेक, वातावरण तंग
  • कटाक्ष/बीड न.प.त तुकडे-तुकडे गँग,बीडकरांनी तमाशा नव्हे विकास मागितला!

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In