
म्हणाले, दोषींवर कारवाई केली जाईल
वडवणी, (रिपोर्टर)ः- डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने उभ्या महाराष्ट्रात संताप उडवून दिलेला असतांनाच आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी डॉ.संपदा यांच्या कुटूंबियांसोबत भ्रमणध्वनीवरून संवाद साधत या प्रकरणात कोणाचा हस्तक्षेप होवू देणार नाही, दोषींेवर कारवाई होईल, नवीन टेक्नॉलॉजीनुसार यात तपास करण्याबाबत पोलिसांना सांगण्यात येईल यासह अन्य बाबींवर चर्चा करत अजितदादांनी मुंडे कुटूंबियांना आधार दिला.
कवडगाव ब्रु. या ठिकाणी डॉ.संपदा मुंडे यांचे कुटूंबिय राहत आहे. गेल्या आठ दिवसाच्या कालखंडात राज्यातील अनेक पक्षाचे नेते, प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी यांनी कुटूंबियांची भेट घेत त्यांना धिर दिला आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मयत डॉ.संपदा मुंडे यांच्याचुलत्यासोबत भ्रमणध्वनीवारून संवाद साधत या प्रकरणात तपासाबाबत कुठली ही हाईगायी केली जाणार नाही जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल आता नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्या आधारावर या प्रकरणाचा तपास करण्याच्या सुचना पोलिसांना दिल्या जातील. यासह अन्य बाबींवर चर्चा करत मुंडे कुटूंबियांना अजितदादांनी धिर दिला.








