
नांदेडच्या वालेगावकर दांपत्याचा मानाच्या वारकरी म्हणून सन्मान
पंढरपूर (रिपोर्टर): कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरातील विठ्ठल मंदिरात आज पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. या वेळी दर्शन रांगेतील पहिले मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटा गावचे रामराव वालेगावकर व सौ. सुशिलाबाई वालेगावकर या दांपत्याचा सन्मान करण्यात आला. मागील 20 वर्षांपासून ते अखंड वारी करत असल्याने मंदिर समितीकडून त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ घालून त्यांचा गौरव करण्यात आला.
या महापूजेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पत्नी व मुलासह उपस्थित होते. मंत्री भरत गोगावले व जयकुमार गोरे यांनीही उपस्थिती लावली होती. यंदाच्या महापूजेत जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांनाही प्रथमच सहभागी होण्याची संधी देण्यात आली.
महापूजेनंतर वारकर्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आषाढी व कार्तिकी वारी ही वारकर्यांची खरी दिवाळी आहे. मानाच्या वारकर्यांना एका वर्षासाठी नव्हे, तर कायमस्वरूपी मोफत एसटी प्रवास सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.
ते पुढे म्हणाले, विठ्ठलाचं मंदिर आणि परिसर ही एक वेगळी ऊर्जा देणारी भूमी आहे. चौथ्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाल्याने स्वतःला भाग्यवान समजतो. आमच्याकडे तखझ नाहीत, फक्त वारकरी आहेत. मी आज जे काही आहे ते विठ्ठलामुळेच.
शेतकर्यांसाठी मोठ्या घोषणा
शिंदे यांनी बळीराजाच्या वेदना व्यक्त करत विठ्ठलचरणी प्रार्थना केली. ते म्हणाले,सलग सात महिने पाऊस आहे, शेतकरी संकटात आहे. राज्य सरकारने 32 हजार कोटींची मदत जाहीर केली असून जून 2026 पर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे.
विकासाच्या घोषणा
चढऊउ ची जागा 30 वर्षांसाठी मंदिराला देणार चंद्रभागा नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन वारीच्या काळात स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा व सुविधा उपलब्ध
एकनाथ शिंदे यांनी शेवटी सांगितले –
राजकारणापेक्षा आध्यात्मिक अधिष्ठान श्रेष्ठ आहे. संपूर्ण महाराष्ट्र सुखी, समृद्ध होवो. बळीराजाच्या जीवनात आनंदाचे दिवस उजाडो, हीच विठुराया चरणी प्रार्थना.








