
एसआयटीबरोबर सीआयडी चौकशी करा -आनंदराज आंबेडकर
वडवणी (रिपोर्टर): महिला आयोगाच्या अध्यक्षा पिडित महिलेबाबत चुकीचे भाष्य करतात तेव्हा आश्चर्य नव्हे तर संताप येतो. डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली ? या प्रकरणी सरकारने अत्यंत गांभीर्याने घेत तपास केला पाहिजे आणि पिडितेला न्याय मिळालाच पाहिजे, असे आनंदराज आंबेडकरांनी म्हटले.
ते आज डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी कवडगावमध्ये आले होते. माध्यमांशी बोलताना आनंदराज आंबेडकर म्हणाले, की सदरची घटना अत्यंत धक्कादायक आणि उभ्या देशाला शर्मेने मान खाली घालावयास लावणारी आहे. एखादी ग्रामीण भागातली तरुणी उच्च शिक्षण घेते आणि तिचा शेवट असा होतो, म्हणजे पुन्हा मनुवादी संस्कृती इथे येते की काय? यातून मुलींना शिक्षण घेता येणार नाही, अशी भीती आनंदराज आंबेडकरांनी व्यक्त केली. या प्रकरणी एसआयटी नेमण्यात आली आहे, परंतु सीआयडीमार्फतही या प्रकरणाची चौकशी व्हावी, असेही आनंदराज आंबेडकरांनी म्हटले.






