
गर्दीचा फायदा घेत आष्टी, माजलगाव, नेकनूर, बसस्थानकातून महिलांच्या गळ्यातील दागिन्यांची चोरी
बीड, (रिपोर्टर)ः- दिवाळी संपल्यानंतर राज्यातील सर्वच बसस्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी वाढली. गर्दीचा फायदा उचलत अज्ञात चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने, पुरूषांच्या खिशातील पैसे, मोबाईल चोरून नेत आहेत. बीडजिल्ह्यात मागील आठ दिवसामध्ये अशा चोर्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. आष्टी माजलगाव, नेकनूर, या बसस्थानकामधून महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी गेल्यानंतर महिलांनी आपले दागिने सांभाळायला हवे.
सरिता गणेश भालेराव (रा.अहिल्यानगर) ही महिला परळी ते पुणे जाणार्या एसटी बसने प्रवास करत असतांना आष्टीच्या परिसरामध्ये या महिलेच्या गळ्यातील 60हजार रूपये किंमतीचे मिनी गंठन अज्ञात चोरट्याने चोरले आपले गंठन चोरीला गेल्याचे महिलेच्या निदर्शनास आल्यानंतर महिलेने या बाबत आष्टी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी घटना माजलगाव बसस्थानकात घडली. चंद्रकला पंडितराव सुरवसे (रा.शेलू जि.परभणी) ही महिला बीड परभणी या बसमध्ये चढत असतांना माजलगावच्या बसस्थानकातून महिलेच्या गळ्यातील 1 लाख 69 हजार 599 रूपयांचे मिनी गंठन चोरून नेले
तर तिसरी घटना नेकनूर बसस्थानकात घडली. विशाखा स्वप्नील मगर (रा.थेरगाव जि.पुणे) ही महिला बीड येडशी बसने प्रवास करता असतांना मांजरसुंबा परिसरात अज्ञात चोरट्याने महिलेच्या पर्समधील 1 लाख 56 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरले आहेत. या प्रकरणीनेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवास करत असतांना गर्दीचा फायदा उचलून चोरटे महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्स मधील पैसे,पुरूषाच्या खिशातील पैसे, मोबाईल चोरत आहेत. विशेष करून दिवाळी नंतर बसस्थानकात गर्दी वाढल्याने चोर्या जास्त वाढल्या आहेत. प्रवास करतांना महिलांनी आपल्या दागिन्याची काळजी घेतली पाहिजे.
गेवराई तालुक्यात घरफोडी
56 हजार रूपयांचा ऐवज पळवला
गेवराई तालुक्यातील आडप्रिंप्री येथील नारायण गणपतराव गलथर यांच्या घरामध्ये चोरीची घटना घडली असून चोरट्याने घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यासह नगदी रक्कम असा 56 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी गलथर यंाच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






