
माय-लेकीस मारहाण करून ऐवज लूटला
बीड (रिपोर्टर): झोपेमध्ये असलेल्या आई व मुलीस मारहाण करून चोरट्याने घरातील सोन्याचे मणी व इतर ऐवज असा 4 हजार रुपयांचा माल चोरून नेला. या प्रकरणी सिरसाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पौळपिंप्री येथे घडली.
संगिता एकनाथ कांबळे व त्यांची आई-बहीण झोपल्या असता अज्ञात चोरट्याने घरामध्ये प्रवेश करत त्यांच्या आईला व बहिणीला मारहाण करत घरातील सोन्याचे मणी व इतर साहित्य असा एकूण चार हजार रुपयांचा ऐवज जबरीने चोरून नेला. या प्रकररी संगिता कांबळे यांच्या फिर्यादीवरून सिरसाळ्या पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटट्याविरोधात गुन्हा दाखल कण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.






