
बीड (रिपोर्टर): एका आयशर टेम्पोद्वारे वाळू जात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलिसांनी सदरील टेम्पो ताब्यात घेतला असून या टेम्पोमध्ये वाळू आढळून आली.
वैभव संतराम जामकर (रा. वडगाव गुंदा) हा त्याच्या आयशर टेम्पो (क्र. एम.एच. 23 ए.यू. 7296) यामधून वाळू गेऊन जात होता.
सदरील प्रकाराची माहिती पिंपळनेर पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला. या टेम्पोत दोन ब्रास वाळू होती. या प्रकरणी जामकर याच्या विरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





