
रसायनिक खतांचे भाव मात्र दुप्पटीने वाढले
बीड (रिपोर्टर): शेतीमालाचे भाव गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये वाढलेले नाहीत, रसायनिक खतांचे भाव मात्र दुप्पटीने वाढलेले आहेत. शेतीमालाला भाव नसल्याने राज्यात शेतकर्यांच्या आत्महत्या वाढल्या. कापूस, सोयाबीनला अत्यंत कमी भाव देण्यात आलेला आहे. त्याप्रमाणात रसायनिक खतांचे भाव वाढवण्यात आले. त्याचप्रमाणात शेतीमालाचे भाव वाढवण्याची मागणी केली जात आहे.
सध्या सोयाबीनला हमीभाव 5 हजाराच्या दरम्यान तर कापसाला 8 हजार रुपये हमीभाव केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे. खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने कापूस, सोयाबीनची खरेदी करू लागले. कापूस, सोयाबीनचे हे भाव सात-आठ वर्षांपासून आहे तेच आहेत. इतर वस्तूंचे भाव मात्र दुप्पटीने वाढले. शेतकर्यांना शेती परवडत नाही, याचं कारण शेतीमालाला बाजारात भावच नसतो. रसायनिक खत, बी-बियाणे, इतर शेतीच्या औजारांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. खरीप हंगामात रसायनिक खतांचे जे भाव होते ते आता रब्बी हंगामात अडीचशे ते तीनशे रुपयांनी वाढले आहेत. रसायनिक खतांचे भाव वाढू शकतात मग शेतीमालाचे भाव का वाढवले जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रसायनिक खत खरीप हंगामातील भाव, रब्बी हंगामातील दर, रसायनिक खत 20:20:013, खरीप हंगामातील भाव रासायनिक खते- 20:20:00:13 – 1200 रुपये क्विंटल, रब्बी हंगामात 1500 रुपये, 10:26:26 भाव 1470 रुपये, 1925 रुपये, 14:34:14 1700 रुपये, 1800 रुपये, 15:15 1470 रुपये, 1670 रु., 24:24:0 1850 रु., 1950 रु., डीएपी 1350 रु., 1350 रु., पोटॅश 1550 रु., 1800 रु., 9:24:24 1800, 2100 रु., 11:30: 14 1800 रु., 1950 रु., सुपर फॉस्फेट 540 रु. 650 रु. अशा पद्धतीचे भाववाढ करण्यात आले आहेत. केंद्र सरकार भाववाढीबाबपत कुठलीही ठोस भूमिका घेत नाही किंवा भाववाढ कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. नुसताच शेतकर्यांबद्दल कोरडा पुळका दाखवण्याचे काम राज्य आणि केेंद्र सरकार करत आहे.





