बीड (रिपोर्टर): बीड जिल्हा रुग्णालय परिसरातील शंभर खाटांची इमारत निधीअभावी आजही कार्यान्वित झालेली नाही. सदरील इमारतीला निधी देण्यात यावा व लिफ्ट, फर्निचर तात्काळ बसविण्यात यावे, या मागण्यांसाठी आज सामाजिक कार्यकर्त्यांनी भीग माँगो लक्षवेधी आंदोलन केले.
बीड जिल्हा रुग्णालय परिसरात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 31 कोटी रुपये खर्च करून शंभर खाटांची इमारत बांधलेली आहे. या इमारतीचे अद्यापही पूर्ण काम झालेले नाही. त्याठिकाणी लिफ्ट आणि फर्निचर बसविण्यात आले नाही. फर्निचर आणि लिफ्टसाठी निधी नसल्याने हे काम रखडले आहे. राज्य सरकारने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी भीक माँगो आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. हे आंदोलन डॉ. गणेश ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.









