शंभराहून अधिक वाहनांवर दंड ठोठावला!
बीड (प्रतिनिधी) माननीय जिल्हा व प्रमुख न्यायाधीश श्री. यावलकर साहेब यांच्या आदेशानुसार आज कोर्ट परिसरातील बेशिस्त वाहनधारकांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. माननीय कोर्ट परिसरात अव्यवस्थितपणे पार्किंग करणार्या जवळपास शंभर ते सव्वाशे वाहनांवर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या कारवाईत मेहरबान सपोनी सुभाष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर, पोलीस हवालदार जाधव, पोलीस अंमलदार राहुल घाडगे आणि चालक नारायण वाघमारे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या कारवाईच्या निमित्ताने जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी सुभाष सानप यांनी जनतेला आवाहन केले की,मा.कोर्ट परिसरात वाहन पार्क करताना नियमांचे पालन करून व्यवस्थित पार्किंग करा, जेणेकरून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही,असे ते म्हणाले.
वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे कोर्ट परिसरातील वाहतूक शिस्तीबाबत जनतेत जागरूकता निर्माण झाली असून, पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.








