धारूर (रिपोर्टर): उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज आणि उद्या शेवटची तारीख आहे. या दोन दिवसात प्रचंड प्रमाणात उलथापालथ होणार आहे. बहुतांश उमेदवार अजूनही निश्चित झाले नाहीत. धारूर नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष स्वरुपसिंह हजारी यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र पक्षाने याबाबत निर्णय बदलला असल्याचे बोलले जाऊ लागले. हजारी यांच्या ऐवजी रामचंद्र निर्मळ हे भाजपाचे उमेदवार असू शकतात. अजित पवार राष्ट्रवादीकडून बालासाहेब जाधव तर शरद पवार राष्ट्रवादीकडून अर्जुनराव गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली.
धारूर नगरपालिका निवडणुकीमध्ये चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येऊ लागले. नगराध्यक्षपदाचे उमेदवा समोर येऊ लागले. उमेदवारी अर्ज मात्र अद्यापही दाखल केलेले नाहीत. आज किंवा उद्या नगराध्यीपदासाठी अर्ज भरले जातील. भाजपाकडून स्वरुपसिंह हजारी यांचे नाव समोर येत असतानाच त्यांना धक्का देत हजा यांच्याऐवजी रामचंद्र निर्मळ यांना जवळपास उमेदवारी निश्चित झाली आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून बालासाहेब जाधव, शरद पवार राष्ट्रवादीकडून अर्जुनराव गायकवाड आणि शिंदे शिवसेनेकडून सुरेश गवळी यांना उमेदवा दिलेली आहे. धारूरमध्ये चौरंगी लढत होणार आहे.













