आ. सना मलिक, शेख तय्यब, फारुक पटेल, मोईन मास्टर, निजाम, नवीदुजमा, मुजीब, तावरे, धांडे, प्रिया डोईफोडे यांनी शहर पिंजून काढले
बीड (रिपोर्टर): बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना, शिवसंग्राम मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता दादासाहेब पारवे यांच्या प्रचारार्थ शहरातील सर्व दिग्गज नेते आणि कार्यकर्ते एकवटले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आ. सना मलिक, शेख तय्यब, फारुक पटेल, मोईन मास्टर, शेख निजाम, सय्यद नवीदुजमा, भागवत तावरे, झुंजार धांडे, शेख मुजीब, महेश धांडे, प्रिया डोईफोडे, शकील खान यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी शहर पिंजून काढले. पालकमंत्री अजितदादांच्या हातात नगर पालिका देण्यासाठी प्रेमलता पारवे यांच्यासह सर्व 52 नगरसेवकांना विजयी करा असे आवाहन सर्वच नेत्यांनी एकजुटीने केले आहे.
बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या प्रचारार्थ पक्ष नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बीड शहरात जोरदार प्रचार यंत्रणा हाती घेतली आहे. पक्षाच्या प्रवक्त्या आ. सना मलिक यांनी दोन दिवस बीडमध्ये अख्खी यंत्रणा कामाला लावत थेट मतदारांशी संवाद साधला. रॅली, कॉर्नर सभा आणि संवाद दौरा या माध्यमातून आ. सना मलिक यांनी अजितदादांच्या विकासाचा रोल मॉडेल जनतेसमोर मांडला.
प्रेमलताताई पारवे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व स्थानिक मातब्बर नेते एकत्र आल्याने निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. बीड शहरात सर्वत्र एकजुटीचे प्रदर्शन दिसत असून राष्ट्रवादी, शिवसेना आणि शिवसंग्रामचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी सध्या प्रत्येक वस्ती, गल्ली आणि चौकात जाऊन प्रेमलताताईंसह घडीच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करू लागले आहेत. सर्वच नेते आणि पदाधिकार्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. सर्वांची एकजूट आणि पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत जात असल्याने बीड नगरपालिकेवर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि स्थानिक नेतृत्व , पदाधिकार्यांनी सुरू केलेल्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.











