Tuesday, May 17, 2022
No menu items!
Homeकोरोनाजुनी दुचाकी देतो म्हणून २२ हजाराला गंडविले

जुनी दुचाकी देतो म्हणून २२ हजाराला गंडविले

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बीड (रिपोर्टर)- जुनी वापरातील दुचाकी देतो म्हणून एका तरुणाला गुगल पे वरून २२ हजार रुपये मागवून घेऊन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असू नया प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्यात ऋषीकेश बब्रुवान वडमारे (वय ४२, रा. गॅरेज एमआयडीसी, नवनाथ नगर, बीड ) यांनी फिर्याद दिली की, त्यांना मोबाईल नं. ७४३६८१६१७५ व ७४३६८१७९०३ या मोबाईल धारकाने ‘तुला सेकंड हँड स्प्लेंडर प्लस गाडी देतो’ असे म्हणून फिर्यादीच्या मोबाईलवरून २२ हजार १०० रुपये स्वत:च्या गुगल पे अकाऊंटला घेतले मात्र त्यांना गाडी दिली नाही. फिर्यादी वडमारे यांना ज्या वेळेस कळाले आपली फसवणूक झाल्याचे कळाल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून या बाबत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम ४२० भा.दं.वि. कलम ३६ नुसार गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास पो.नि. ठोंबरे हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!