Tuesday, January 19, 2021
No menu items!
Home राजकारण ग्रामपंचायत निवडणुकीत अटीतटीच्या लढती पॅनल जिंकण्यासाठी गाव पुढार्‍यात स्पर्धा

ग्रामपंचायत निवडणुकीत अटीतटीच्या लढती पॅनल जिंकण्यासाठी गाव पुढार्‍यात स्पर्धा


पार्ट्यांचा जोर चढला, प्रचार अंतीम टप्यात
बीड (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यामधल्या १२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषीत झाल्या. यातील काही ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या.ज्या ग्रामपंचायतीसाठी १५ तारखेला मतदान होणार आहे. त्या ग्रामपंचायत मध्ये अतितटीच्या लढती पहावयास मिळू लागल्या. पॅनल प्रमुखांनी आपलं पॅनल निवडुण यावे यासाठी मोठा जोर लावला. फोडाफोडी आणि तडजोडीला आतापासून वेग आला. मतदारांना आकर्षीत करण्यासाठी पार्ट्यांचा जोर चढला. ग्रामीण भाागातील धाबे हाऊसफुल दिसून येवू लागले.
ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये गाव पुढारी सर्वस्वपणाला लावून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेक गावात प्रस्थापीत गाव पुढार्‍यांची मक्तेदारी आहे. आपली सत्ता जावू नये म्हणून गाव पुढारी साम,दाम, दंडाचा वापर करत असतात. गेल्या काही दिवसापूर्वी १२९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका घोषीत झाल्यापासून निवडणुकीची तयारी गाव पुढारी करत आले. १५ तारखेला मतदान होत असल्याने गावातील मतदार फोडाफोडीला प्रचंड प्रमाणात वेग आला. काही गावामध्ये दोन तर काही गावामध्ये तिन व चार पॅनल निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहे. मतदारांना जवळ करण्याच्या उद्देशाने त्यांना पार्ट्यां दिल्या जातात. ग्रामीण भागातील धाबे आणि बियरबार दिवसभर हाऊसफुल दिसतात. काही मतदारांना आर्थीक लालूच देवून त्यांना फोडण्याचा प्रयत्नही होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीने १२९ ग्रा.प.मधील वातावरण चांगलेच ढवळून निघाल आहेत.

मतदारांचा उमेदवार घेताहेत शोध
निवडणुकीमध्ये उमेदवार मतदारांना शोधत असतात. गावपातळीवरच्या निवडणुकीत एका एका मताला महत्व असतं. ग्रामीण भागातील अनेक नागरीक शहरी भागामध्ये राहत असतात. शहरी भागात राहणार्‍या मतदारांचा उमेदवार व त्यांचे पॅनल प्रमुख शोध घेतांना दिसून येत आहे. जे कधी जवळून गेल्यावर बोलत नव्हते असे लोक निवडणुकीत मतदारांना प्रचंड प्रमाणात विनवण्या करत असल्याचे चित्र दिसून येवू लागले आहे.

ऊसतोडणीला मजूर गेल्यामुळे त्याचा परिणाम अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत होणार आहे. ज्या गावामध्ये अगदी काट्याची टक्कर आहे. अशा गावातील गाव पुढारी ऊस तोडणीसाठी गेलेल्या मजुरांना मतदांनासाठी आपल्या गावाकडे आणण्याचा प्रयत्नात आहे. येण्याजाण्याचा खर्चा करत अन्य इतर खर्च करण्याची तयारी पॅनल प्रमुख मतदारांसाठी दाखवू लागले.

Most Popular

तीन मिनिटाची डेंजर ट्रॅव्हलींग सिंदफणा नदीतील थरार

बीड तालुक्यातील आहेरचिंचोली ग्रामस्थांची ३० टक्के शेती सिंदफना नदीच्या दुसर्‍या बाजूला असल्याने दररोज होडीतून प्रवास करून शेतात जाण्याची वेळशेत मालकांना, शेत मजूर,...

बीड तालुक्यात ८ ग्रा.पं.सेनेच्या तर ४ ग्रा.पं. राष्ट्रवादीच्या ताब्यात

बीड (रिपोर्टर)- तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाल्यानंतर आज मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा दुपारपर्यंत १२ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून ८ ग्रामपंचायती शिवसेनेच्या...

गेवराई तालुक्यावर अमरसिंह पंडितांचा वरचष्मा सुरेश हात्तेंसह बप्पासाहेब तळेकर गटाचा दारुण पराभव

गेवराई (रिपोर्टर)- जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या गेवराई तालुक्यातील तलवाडा, मादळमोही, गढी, ग्रा.पं.सह २२ ग्रामपंचायतींपैकी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ८, भाजपा ५, शिवसेना ४, महाविकास...

केजच्या सहा ग्रा.पं.वर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा

केज (रिपोर्टर)- ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली. तालुक्यातील २३ ग्रामपंचायतींपैकी १९ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका झाल्या होत्या. चार ग्रा.पं. बिनविरोध निवडण्यात आल्या....