• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

विनायक मेटेंचा घात की घातपात?, अजित पवारांनी सभागृहात मांडला मुद्दा, ड्रायव्हरच्या उलटसुलट वक्तव्यांमुळे शंका

by Beed Reporter
August 22, 2022
Reading Time: 1 min read
0
बीडच्या शेतकर्‍यांना गोगलगाईने उद्ध्वस्त केले, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळसदृश्य परिस्थिती; शेतकरी प्रचंड अडचणीत तरीही….दोघांचं कॅबिनेट निर्धास्थ
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

मुंबई (रिपोर्टर) शिवसंग्राम नेते विनायक मेटे यांच्या अपघातप्रकरणी आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रश्‍न उपस्थित केला. अजित पवार म्हणाले, अपघाताबाबत मेटेंच्या ड्रायव्हरची वक्तव्ये वारंवार बदलत आहेत. त्यामुळे मेटेंचा अपघात झाला की तो घातपात होता? अशी शंका निर्माण झाली आहे. सरकारने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे का?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर अपघाताची चौकशी सीआयडीकडे सोपवण्यात आल्याचे सांगितले. सर्वसामान्यांच्या मनात 1 टक्काही संशय राहणार नाही. अशा पद्धतीने तपास करण्यात येईल व कुणी दोषी आढळल्यास त्याला सरकार सोडणार नाही. दोषीवर  तातडीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही फडणवीसांनी दिली.

अजित पवार म्हणाले, विनायक मेटे यांच्यासोबत अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या मृत्यूप्रकरणी सभागृहात प्रश्‍न विचारण्याची वेळ येईल, असे कधी वाटले नव्हते. मेटेंच्या ड्रायव्हरकडूनही अपघाताबाबत वारंवार वेगवेगळे वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात अपघाताबाबत शंका निर्माण होत आहेत. नुकतेच माझे विनायक मेटे यांच्या पत्नीसोबत बोलणे झाले. त्यांनी अपघाताबाबत काही प्रश्‍न विचारले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास टाळाटाळ केली का? असे असेल तर याप्रकरणी काही गुन्हा दाखल झाले आहे का? अपघाताप्रकरणी जबाबदारी निश्‍चित करुन सरकार कारवाई करणार का?, असे प्रश्‍न विनायक मेटेंच्या पत्नीने विचारले असल्याचे पवार यांनी सांगितले.
कुणालाही सोडणार नाही
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, ड्रायव्हरचे स्टेटमेंट बदलत असल्यामुळे शंका निर्माण होत असल्याचे खरे आहे. त्यामुळेच या अपघाताबाबत 1 टक्काही संशय राहू नये यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात जो दोषी आढळले त्याला सरकार सोडणार नाही. गुन्हेगारी स्वरुपाचा तपास सीबीआय करणार आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकार्‍यांकडून प्रशासकीय तपासही करण्यात येणार आहे. कर्तव्यात कुणी कसूर केल्याचे आढळल्यास सरकार अशांना पाठीशी घालणार नाही.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 8 लेन करण्याची मागणी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांची गर्दी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सध्या 6 लेन असलेला हा मार्ग 8 लेन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अजित पवार म्हणाले, राज्यात सर्वाधिक वर्दळ असलेला हा महामार्ग आहे. या महामार्गावर अवजड वाहनांची संख्याही सर्वाधिक आहे. मार्गावर अवजड वाहने बेदरकारपणे चालवली जातात. त्यामुळे इतर वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच मार्गावरुन प्रवास करावा लागतो. या मार्गावर अवजड वाहंनांसाठी एक लेन असली तर ओव्हरटेक करताना अवजड वाहने लेन सोडतात. त्यामुळे अवजड वाहनांसाठी स्वतंत्र दोन लेन हवीत, अशी मागणी अजित पवारांनी केली.

रात्रीचा प्रवास टाळावा
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबई-पुणे एक्सप्रेस वे 8 लेन करणे आवश्यक असल्याचे सरकारचेही मत आहे. यासाठी महामार्गाच्या बाजूला जागा आहे का, याची चाचपणी केली जाईल. त्यानंतर आवश्यक तो निर्णय घेतला जाईल. याशिवाय विनायक मेटेंसोबत जे झाले, ते इतर कुणासोबतही होऊ नये यासाठी शक्यतो रात्री 3 ते पहाटे 5 पर्यंतचा प्रवास टाळावा, असे आवाहनही फडणवीसांनी केले.

Previous Post

गोगलगाय पिडीत शेतकर्‍यांना एनडीआरएफ निकषांच्या तिप्पट मदत द्या, धनंजय मुंडेंनी वेधले सरकारचे लक्ष

Next Post

साहेब ज्या कामासाठी चालले होते त्या कामाची सोडवणूक म्हणजे साहेबांना खरी श्रध्दांजली -ज्योतीताई मेटे

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
साहेब ज्या कामासाठी चालले होते त्या कामाची सोडवणूक म्हणजे साहेबांना खरी श्रध्दांजली -ज्योतीताई मेटे

साहेब ज्या कामासाठी चालले होते त्या कामाची सोडवणूक म्हणजे साहेबांना खरी श्रध्दांजली -ज्योतीताई मेटे

ताज्या बातम्या

अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?

July 5, 2026

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख -त्रैतायुगात मारीचाने हरणाचे रूप घेऊन रामाकडून सितेला लुटले कलियुगात प्रभूरामाला लुटणारे कोण?
  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?