बीड | ऑनलाईन रिपोर्टर
Maharashtra Police अंतर्गत Beed जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया Police Headquarters Beed येथे राबविण्यात येत आहे.
या भरतीदरम्यान आजारी असलेले उमेदवार, दुसऱ्या घटकात मैदानी चाचणी असलेले उमेदवार, एकाच दिवशी चालक व पोलीस शिपाई पदाची मैदानी चाचणी असलेले उमेदवार, राज्य राखीव पोलीस गटातील नक्षलगस्त बंदोबस्तासाठी तैनात उमेदवार, एकाच दिवशी आर्मी भरती व पोलीस भरती असलेले उमेदवार तसेच मैदानी चाचणीदरम्यान वैद्यकीय कारणास्तव पूर्ण चाचणी न करू शकलेले उमेदवार — अशा सर्वांसाठी विशेष निर्णय घेण्यात आला आहे.
मा. अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) यांच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने, वरील कारणांमुळे पूर्ण मैदानी चाचणी पूर्ण न करू शकलेल्या उमेदवारांना एक अतिरिक्त संधी देण्यात येत आहे.
त्यानुसार संबंधित उमेदवारांनी —
कवायत मैदान, नगर रोड, पोलीस मुख्यालय बीड
️ दिनांक : 18/02/2026
⏰ वेळ : सकाळी 07.00 वाजता









