बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अनेक वर्षापासून तुतीची लागवड करून कोसल्याचे उत्पादन घेत आहेत. या उत्पादनामुळे सदरील शेतकर्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. त्यांना शासनाकडूनही अनुदान दिले जात आहे. बीड जिल्ह्यात 5140 शेतकर्यांनी 5153 एक्करात लागवड केलेली असून यंदा 2150 एक्करमध्ये लागवाडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे.
कोसल्याला बाजारात चांगला भाव मिळतो. पुर्वी जालना येथे कोसल्याला मार्केट होते मात्र बीड जिल्ह्यात तुतीचे क्षेत्र वाढतअसल्याने बीडच्या बाजार समितीमध्ये कोसल्याची खरेदी विक्री केली जात आहे. कोसला उत्पादनातून शेतकर्यांनाचांगला फायदा होवू लागला. विशेष करून शासनाकडून त्याला आर्थिक मदत देखिल केली जात आहे. बीड जिल्ह्यात सध्या स्थितीत 5140 शेतकर्यांनी 5153 एकरात तुतीची लागवड केलेली आहे. यंदा जिल्ह्यासाठी 2150 एक्करात लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहेत.








