• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home क्राईम

मला मेल्यानंतर तरी न्याय द्या! म्हणत पत्नी पिढीत तरुणाची आत्महत्या

by गणेश सावंत
April 10, 2026
Reading Time: 1 min read
0
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

— पत्नी व सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; फेसबुक पोस्टमुळे खळबळ
परळी (बीड) : रिपोर्टर
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील नागापूर येथे एका ३० वर्षीय तरुणाने पत्नी व सासरच्या कथित छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहीत “मला मेल्यानंतर तरी न्याय द्या” अशी भावनिक विनंती केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे.


मृत तरुणाचे नाव रामेश्वर गव्हाणे (वय ३०) असे असून, तो नागापूर (ता. परळी) येथील रहिवासी होता. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह उखळी येथील नम्रता जाधव हिच्याशी झाला होता. सुरुवातीला साधेपणाने पार पडलेला हा विवाह पुढे वादग्रस्त ठरल्याचे समोर येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर गव्हाणे याने शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेपूर्वी त्याने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहून आपल्या आत्महत्येमागील कारणे मांडली आहेत. या पोस्टमध्ये त्याने पत्नी नम्रता जाधव व तिच्या माहेरच्या मंडळींकडून गेल्या दोन वर्षांपासून सतत मानसिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.


रामेश्वरने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, पत्नी त्याला सतत त्रास देत होती, अपमान करत होती आणि विविध कारणांनी भांडणे घालत होती. तसेच सासरच्या मंडळींनी त्याची फसवणूक करून विवाह लावल्याचा आरोपही त्याने केला आहे. काही नातेवाईकांनी सोन्याच्या दागिन्यांबाबत फसवणूक केल्याचेही त्याने म्हटले आहे.
याशिवाय, अंबाजोगाई येथील एका नर्सिंग होममधील डॉक्टरांवर खोटे वैद्यकीय अहवाल दिल्याचा गंभीर आरोप त्याने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. “माझी पत्नी गरोदर असल्याचे खोटे दाखवून मला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा दावा त्याने केला असून, या प्रकरणाची चौकशी करून संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे.


रामेश्वरने आपल्या आई व कुटुंबीयांची माफी मागत, “मी गेल्या दोन वर्षांपासून सहन करत असलेला त्रास असह्य झाला आहे, त्यामुळे हे टोकाचे पाऊल उचलत आहे,” असे नमूद केले आहे. तसेच “माझ्या मृत्यूनंतर तरी मला न्याय मिळावा,” अशी शेवटची इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. फेसबुक पोस्टच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे नागापूर व परिसरात संतापाची लाट उसळली असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. या प्रकरणातील सर्व आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

पोष्ट जश्याला तशी……

आई आणि सुरेखा मला माफ करा मी जे गेल्या दोन वर्षांपासून सहन करतो आहे. ते मनाला खूप वेदना देणारे आहे. त्यामुळे मी हे टोकाचे पाऊल उचलले आहे. माझ्या बायकोच्या नम्रता जाधव हिच्या त्रासाला कंटाळून मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे. गेल्या दोन वर्षांपासून ती माझा प्रचंड मानसिक छळ करत आहे. सद्या ती म्हणत आहे की, मी गरोदर आहे.सात आठवड्याची गरोदर आहे. तिचे उपचार आई नर्सिंग होम अंबाजोगाई येथे सुरू आहेत. तेथील डॉ. सुनिता तोंडगे यांनी बाळाचे टोके सुरू झाले आहेत असे आजच म्हटले आहे. तसा रिपोर्ट दिला आहे. पण तो खोटा रिपोर्ट आणि फेक उपचार त्या करत आहेत. डॉक्टरांना मॅनेज करून माझी बायको माझी फसवणूक करत आहे. वर्षा मराठे गव्हाणे यांनी तिला या कामात मदत केली आहे. परळीच्या गुघे मॅडम यांचे आणि डॉ सुनिता तोंडगे आणि डॉ.गणेश तोंडगे यांच्याकडे सेटिंग लावून ती माझी फसवणूक करत आहे. कारण उद्या जर मी कोर्टात धाव घेतली तर म्हणता येत मुलं राहिलं होतं नंतर गर्भपात झाला. म्हणजे वंध्यत्वाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ती परत आली आहे‌. त्यामुळे आजच माझ्या बायकोची सोनोग्राफी करावी आणि आरोग्य विभागात सुरू असलेला गैरप्रकार थांबवावा ही नम्र विनंती. या प्रकरणातील खोटे रिपोर्ट देणार्या सर्व डॉक्टरांवर सखोल चौकशी करून कारवाई करावी.
यापूर्वी ही ती मला मारहाण करून उखळीला गेली होती. तिने मला मारहाण केली तरी मी तिला काहीही केलं नाही. तिला माझ्याकडून पैसे घेऊन जायचे आहेत. या आधीच तिची मावशी आणि काका यांनी सोन्याचे ओरीजनल दागिने घेऊन गेले आहेत आणि हुबेहूब सोन्यासारखे दागिने तयार करून माझ्या घरी आणून ठेवले आहेत. माझ्यावर सोन्याच्या चोरीचा आळ घालून किंवा इतर काही तरी कारणाने माझ्याकडून पैसे काढून घ्यायचे आहेत. रात्री मी झोपेत असताना मला घाबरवण्यासाठी अंगाला टच करते. चिमकुरे घेते, माझ्या जेवण मीठ, चटणी, मसाला जास्त टाकते अजून दुसरं काही तरी मिक्स करते‌ ज्यामुळे मला काहीच कळत नाही काय होतं आहे ते. गेल्या दोन वर्षांपासून माझा अपमान करणं, मला शिव्या देणं, मला उचकावणं, माझ्यासोबत छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे करणं. स्वयंपाक जास्त करून ठेवणं. ज्यामुळे आईला नेहमी शिळीच भाकरी खावी लागल्यामुळे तिला पोटात दुखू लागले. सुरूवातीला सुरेखालाही खालीवरी पाहत होती मात्र तिने फरशी पुसायचे औषधं पिल्यापासून तिने तिला त्रास देणं कमी केलं. हा माझा छळ सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत माझे नातेवाईक आहेत ते माझ्याकडून बोलत पण नाहीत कारण मी त्यांना जाब विचारला आहे. इतर कोणी मध्ये पडत नाही. त्याबरोबर त्यांनी फसवणूक केल्यामुळे त्यांना मला कसा त्रास होईल आणि मी कसा अडचणीत सापडेल किंवा मला जाळ्यात कसं पडायचं यासाठी ते प्रयत्नशील होते. यात त्यांनी माझे मित्र गळाला लावले. मोबाईल फोन हॅक करणे असे प्रकार केले असू शकतात. मला त्रास द्यायचा भडकवायचे आणि दुसरीकडून मी भडकलो की रेकॉर्डिग करून घ्यायचे असे अनेक प्रकार त्यांनी केले आहेत. कारण ते सराईत आहेत. त्यांना त्यांचं पितळ उघडे पडू द्यायचे नाही. त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ते माझ्या मागे घात धुवून लागले आहेत.
असं लग्न करून केली फसवणूक
दोन वर्षांपूर्वी लबाड लांडग्यांनी एकट्यात गाठून हरणाची शिकार केली‌. ज्ञानोबा जाधव, सुमित्रा जाधव, प्रल्हादराव शिंदे, शिवाजी शिंदे, पंढरी शिंदे, बबन शिंदे, सुभानराव शिंदे यांनी माझ्या इतर नातेवाईकांना मामा, गावातील लोकांना मध्ये न पडू देता किंवा मला म्हणाले की, मोठं लग्न करण्यात उगाच पैसे खर्च करण्याऐवजी छोटं लग्न करू असं म्हणून त्यांनी मला इतर नातेवाईकांना किंवा माझ्या गावातील लोकांना मध्ये सहभागी न करता माझं लग्न जमवलं. कारण यांना मुलीच्या मेडिकलविषयी सगळी माहिती म्हणजे या मुलीला मुल होत नाही याविषयी माहिती होती, ती माझ्यापासून लपवून माझी फसवणूक करून नम्रता जाधव आणि माझा विवाह लावला. या प्रकरणी वरील नावे घेतलेली मंडळी ही पडद्यासमोर होते तर पडद्याच्या मागे बालासाहेब सावंत हा माझ्या बायकोचा नातेवाईक आहे. आणि नवीन मराठे, वकील प्रकाश मराठे, वर्षा मराठे गव्हाणे हे होते. वरील तिघेही लग्न लावायला सुध्दा आली नव्हती. तर वर्षा मराठे गव्हाणे या लग्नाला होत्या. हे पडद्या मागचे कलाकार का म्हटलं आहे कारण त्यांचा माझ्यावर राग होता. माझ्या लग्नामुळे त्यांच्या जावायाला म्हणजे माझ्या भावाला त्यांच्या मनाप्रमाणे शेती वाटून द्यायची होती. मी त्यात मुख्य अडथळा होतो. त्यामुळे मला संपवण्यासाठी त्यांनी हे कटकारस्थान रचले. मी त्यांचं ऐकत नसल्याने मग त्यांनी मध्यस्थी करण्याची जबाबदारी मसला येथील प्रल्हाद शिंदे, आदींना दिली‌. नंतर लग्न झाल्यानंतर माझी बायको हे घर मला माझं वाटत नाही. मला इथं राहायचं नाही असं मला बोलत होती माझ्यासोबत वाद घालून तिचा बाप आणि भाऊ वारंवार घेऊन जात होते. थोड्या दिवसांनंतर कळलं की तिला मासिक पाळी येत नाही. तिला 2009 पासून हा प्रोब्लेम आहे. मुलं होण्यासाठी पाळी नियमित करून उपचार सुरू करू म्हटलं तरी माझ्या सोबत दवाखान्यात येत नव्हती‌. आली तरी म्हणायची इथले दवाखाने चांगले नाहीत. त्यामुळे मी दावाखान्यात येणार नाही. दवाखान्यात डॉक्टरांना काय बोलायची त्यानंतर डॉक्टरांची बोडीलॅग्वेज बदलून जायची. यासंदर्भात मी तिच्या वडिलांना विचारले असता ते काहीच बोलले नाहीत तर प्रल्हादराव शिंदे यांना या गोष्टीचा जाब विचारला असता त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरे दिली. जा तुला काय करायचं असेल तर कर असे म्हटले. मी म्हणालो, याचे काय करायचे तर त्यांनी पंढरी शिंदे, बबन शिंदे, ज्ञानोबा जाधव, आणि माझ्या बायकोचा काका माधव शिंदे माझ्या घरी आले आणि मला विचारू लागले काय करायचं म्हणून मी म्हणालो, हे सगळं प्रकरण तुम्ही केलं आहे. आणि तुमची मुलगी मला त्रास देत आहे मला इथं राहायचं नाही म्हणून मी काय करावे जे काही करायचे असेल ते आता तुम्हीच करा. त्यांना कसं वाटतं होतं की मला खरं कळलं आहे मी मुलीला नांदविण्यास नकार देईल मग ते पैसे मागून मुलीला घेऊन जातील. म्हणजे त्यांना माझ्याकडून पैसे काढून घ्यायचे होते. त्यांचा माझ्या पैशावर आणि संपत्तीवर डोळा ठेऊनच त्यांनी लग्न केले आहे. त्यांना सपोर्ट हा सिनियर वकील प्रकाश मराठे यांचा असल्याने ते कशातच मागेपुढे पाहत नव्हते. याच दरम्यान मुलगी मला प्रचंड मानसिक ताण देत होती. एक दोन वेळा तिने माझ्या अंगावर हात उचलला होता. मी जाऊद्या म्हणून हिच्या नादी लागून काही फायदा नाही.
मी माझी बायको आणि तिच्या घरचे यांना कंटाळून गेलो आहे त्यामुळे मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण माझी बायको मला म्हणाली आहे. तुला मी कधीच नीट जगू देणार नाही. माझ्यामागे माझे आणि तुझे नातेवाईक आहेत‌. मी पैसे आणि शेती तर तुझ्याकडून घेऊनच जाणार आहे‌. शिवाय तुला पुढच्या आयुष्य खोट्या केसेस करून कोर्ट कचेरी आणि जेलची हवा खावी लागेल. त्यामुळे मी कंटाळून हे पाऊल उचलत आहे. तरी माझी विनंती आहे की, या लोकांना कायद्याने कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण त्यांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. पोलीस प्रशासन, सुज्ञ नागरिकांना मी विनंती करतो की, मला मेल्यानंतर तरी न्याय द्या. मला न्याय मिळाला तर यापुढे माझ्यासारख्या एखाद्या निष्पाप मुलाचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही आणि त्याला माझ्यासारखी आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये.
भैय्या आई आणि सुरेखाची काळजी घे. मला माहिती आहे मी आत्महत्या करून प्रश्न सुटणार नाहीत पण मला होणाऱ्या असह्य वेदना मी सहन करून कंटाळून गेलो आहे.
केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी,
काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी!!
मी बोललोच नव्हतो, माझ्या व्यथा कुठेही
सांगुन टाकल्या पण, माझ्याच आसवांनी !!
नेकीस आज माझ्या काहीच अर्थ नव्हता,
मी बेईमान ठरलो, लोकात बेईमानी!!
मी सत्य बोललो अन भलते घडुन गेले,
दुश्मन बनुन गेले माझेच दोस्त जानी!!
विश्वास वाटल्यावर, विश्वास ठेवला मी
त्यानीच कापला की, माझा गळा नखांनी !!
हे लाचखोर गेले देशा करुन स्वाहा,
गेले कुठे कळेना देशातले इमानी ?
गाफील राहीलो मी, त्या नेमक्या क्षणाला,
मागून वार केले, माझ्याच माणसानी!!
दोस्तासमान माझे सुख बेईमान झाले,
अद्याप दु:ख आहे, शत्रूपरी इमानी!!
विसरुन जावयाचा अधिकार तुज असावा,
त्याच्या मुळेच सहजी, ही संपली कहाणी !!
Previous Post

मला मेल्यानंतर तरी न्याय द्या! म्हणत पत्नी पिढीत तरुणाची आत्महत्या

Next Post

केज तालुक्यात चुलत्याकडून तरुणीवर अत्याचार; धमकीनंतर पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न, एक आरोपी अटकेत

संबंधित बातम्या

बीड

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

by गणेश सावंत
May 30, 2026
क्राईम

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

by गणेश सावंत
May 24, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
केज

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

by गणेश सावंत
May 23, 2026
क्राईम

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

by गणेश सावंत
May 23, 2026
Next Post

केज तालुक्यात चुलत्याकडून तरुणीवर अत्याचार; धमकीनंतर पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न, एक आरोपी अटकेत

ताज्या बातम्या

14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी

May 30, 2026

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश

May 24, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

May 23, 2026

मोठी बातमी – सिंधफणेच्या काठावर मानवी कवटी, शरीराचा सापळा आढळल्याने खळबळ

May 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • 14 मागण्या आणि सरकारकडून 14 आश्वासनं; मनोज जरांगे रणरणत्या उन्हात उपोषणावर, अंतरवाली सराटीत पुन्हा मराठा आरक्षणाच्या लढ्याची ठिणगी
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतील अपहार प्रकरणात बीड सायबर पोलिसांची मोठी कारवाई८१ लाख ७८ हजारांची रक्कम परत मिळवण्यात यश
  • बीड जिल्ह्यात MPDAचा धडाका : एकाच दिवशी पाच गुंडांवर कठोर कारवाई

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?