भायाळा (रिपोर्टर) भायाळा ता. पाटोदा येथील रहिवासी एसटी महामंडळ यामध्ये सेवा केलेले डाव्या पुरोगामी विचाराचे खंदे पुरस्कर्ते कॉ. अतहर बाबर, कॉ. एकबाल पेंटर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी काशिनाथराव जाधव, गंगाधर आप्पा बुरांडे, माजी आमदार विश्वनाथराव दराडे या दिग्गजांसोबत काम केलेले जनता बोर्डिंग चे विद्यार्थी पाटील बुवा पाखरे हे मनमिळावू व्यक्तिमत्व होते, जसे बोलणार तसेच ते वागत आले, त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक दत्तोबा पाखरे हे वारकरी सांप्रदायात गडकरी म्हणून भगवान महाराजां सोबत असायचे स्वतःचे लग्न ब्राह्मणी व्यवस्था नाकारून त्यांनी केले. मराठवाडा विकास आंदोलनात त्यांचा सहभाग होता.एस.टी. कर्मचारी संघटना भाऊ फाटक यांचे नेतृत्वात एसजी पाटील यांच्या समवेत त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला.
19 जानेवारी भारत बंद मध्ये एसटी कर्मचार्यांना सक्रिय सहभाग घेतला. पोलीस यंत्रणेने हस्तक्षेप केला त्याला प्रखर विरोध पाखरे यांनी केला त्यामुळे पोलिसांनी व तत्कालीन पीएसआय खान यांनी त्यांना बेदम मारहाण केली त्यांच्या डोक्याला जखम झाली. परंतु न डगमगता ते झुंजत राहिले.आपल्या स्वतःचा मुलगा एम्स भोपाळ येथे उच्च विद्याविभूषित अभिजीत पाखरे या मुलाचे लग्न हुंडा न घेता त्यांनी केले. मुलगी वंदना डॉक्टर आहे समाज काय म्हणेल याचा किंचितही विचार न करता त्यांनी तिच्या मनासारखे आंतरजातीय लग्न करून दिले. डाव्या चळवळीतील जनार्दन तुपे हे त्यांचे मित्र तुपे यांच्या लग्नानंतर त्यांचा संसार उभा राहत असताना मदत पाखरे यांनी केली. जाती जातीच्या भिंती तोडून मैत्री जपली.अचानक त्यांच्या मृत्यूमुळे पुरोगामी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. डॉ.के.डी. पाखरे नेत्रतज्ञ यांचे मोठे बंधू होते. त्यांच्या पश्चात दोन मुली एक मुलगा पत्नी असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दिनांक 22/05/2022 रोजी वार रविवार सकाळी 10:30 वाजता त्यांचे मुळगाव मौजे भायळा ता. पाटोदा जिल्हा बीड येथे संपन्न झाला. रक्षाविसर्जन कार्यक्रम उद्या दिनांक 23/05/2022 वार सोमवार सकाळी 8::00 संपन्न होईल.