बीड (रिपोर्टर)ः- राज्य राखीव पोलीस बल गट-१ पुणे येथील सहाय्यक समादेशक सादीक अली नुसरत अली सय्यद यांची समादेशक (पोलीस अधिक्षक ) पदावर पदोन्नती झाली असून ते राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१९ अहमदनगर येथे कार्यभार स्विकारणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात १९८४ साली रुजू झाले.त्यांच्या सेवा कालावधीत त्यांनी अमरावती पुणे शहर, पुणे ग्रामीण, लोहमार्ग पुणे, मुंबई शहर, पोलीस प्रशिक्षण केंद्र खंडाळा,व राज्य राखीव पोलीस बल गट १ व २ पुणे येथे त्यांच्या सेवा कालावधीत उत्तम कामगिरी केलेली आहे. तसेच विविध साामाजिक व पर्यावरण पुरक उपक्रम राबविलेले आहे.सय्यद यांना पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे उल्लेखनीय सेवे बद्दल सन २०१७ साली सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आलेले आहे.
तसेच सन २०२० मध्ये त्यांना उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांनी आपले कर्तव्य,सचोटी प्रामाणीकपणा व अत्यंत जबाबदारीने पार पाडल्याने त्यांच्या सेवाभिलेखाचा विचार करुन प्रशसनीय कार्यासाठी भारत सरकारने राष्ट्रपती पोलीस पदक देवून गौरवलेले आहे. सादीक सय्यद हे बीड जिल्ह्यातील मुळचे आष्टीचे रहीवाशी आहे. सेवा कालावधीत त्यांनी कौशल्यपुर्ण कामगिरी व कठोर परिश्रम केल्यामुळे त्यांना समादेशक (पोलीस अधिक्षक) या पदावर पदोन्नती मिळाली आहे. त्यांना समादेशक पदावर पदोन्नती मिळाल्याने समाजातील सर्वच स्तरातील मान्यवरांनी त्यंाच्यांवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. समादेशक गट १९ अहमदनगर या पदोन्नती ठिकाणी ते समादेशक पदाचा कार्यभार स्विकारणार आहे.