बीड तालुक्यात २६ तर जिल्ह्यात ५४ पॉझिटिव्ह
बीड (रिपोर्टर):- गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रूग्ण कमी प्रमाणात आढळून येत असल्याने नागरिकांनी मास्क वापरणे बंद केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना मुसंडी मारू लागला आहे. काल जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण केवळ २० होते. मात्र आज बीड तालुक्यातच २६ असून जिल्ह्यात ५० जण बाधीत आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
आता कोरोना गेला असे म्हणत नागरिक सार्वजनिक कार्यक्रमात गर्दी करू लागले आहेत. यावेळी कुठलेही कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. आज आरोग्य विभागाला ६९९ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये तब्बल ५४ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या आठवड्यात हा सर्वात मोठा आकडा आहे. यातील २६ रूग्ण हे बीड तालुक्यातील आहेत. त्या पाठोपाठ आष्टी ८, अंबाजोगाई, केज प्रत्येकी ४, गेवराई, परळी, पाटोदा प्रत्येक ३ तर वडवणी, शिरूर आणि माजलगावमध्ये प्रत्येकी १ रूग्ण आढळून आला आहे. ६९९ पैकी ६४५ रूग्ण निगेटीव्ह आले आहेत.