बीड (रिपोर्टर) तुमचे पॅन कार्ड ब्लॉक झाले आहे, त्यामुळे तुमचा पॅन नंबर सांगा, असा एसएमएस आल्याने त्याला रिप्लाय देत आपला पॅन नंबर सांगताच खात्यातून 3 लाख रुपये लंपास केल्याची घटना 25 ऑगस्ट रोजी घडली असून या प्रकरणी फसवणुक झालेल्या व्यक्तीने माजलगाव ग्रामीण पोलिसात तक्रार दिली.
अनिल बंडु कोळेकर (रा. पुरुषोत्तम पुरी ता. माजलगाव) या कृषी सेवा केेंद्र चालकाला 25 ऑगस्ट रोजी त्याच्या मोबाईल नंबरवर एक एसएमएस आला होता. त्या एसएमएसमध्ये म्हटले होते की, तुमचे पॅन कार्ड ब्लॉक झाले आहे, ते अपडेट करण्यासाठी पॅन नंबर सांगा, त्याने पॅन काडर्र् नंबर सांगताच त्याच्या खात्यातून 3 लाख रुपये लंपास झाल्याचा मॅसेज आल्याने आपली फसवणुक झाल्याचे कोळेकर यांच्या लक्षात येताच त्यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्याविरोधात तक्रार नोंदविली.