Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडघरफोड्या करणार्‍या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

घरफोड्या करणार्‍या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या


१३ ग्रॅम सोनेसह नगदी रक्कम केली जप्त; एलसीबीची कारवाई
बीड (रिपोर्टर)- गेल्या आठ दिवसांपुर्वी बीड शहर आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी चोर्‍या करून फरार झालेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून त्याने चोरलेला मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मित्रनगर येथील शिवाजी रामराव घोळवे हे ८ जानेवारीपुर्वी गावाला गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून आरोपी सिराज सय्यद (वय ३६, रा. पुरग्रस्त कॉलनी बीड) याने घरात प्रवेश करत घरातील १३ ग्रॅम सोने त्यामध्ये १० ग्रॅमची सोन्याची चैन, व ३ ग्रॅमची अंगठी आणि नगदी १० हजार रुपये घेऊन फरार झाला होता. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात सीआर नं. ७ / २०२१ नुसार चोरीचा गुन्हा दाखल झाला होता तर डिसेंबर २०२० मध्ये महादेव स्वीट होम येथेही चोरी झाली होती. त्यामध्ये ११ हजार रुपये लंपास केले होते. या प्रकरणी शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात तक्रार दाखल होती. या दोन्ही गुन्ह्यातील आरोपीच्या काल भाजी मंडई परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. या वेळी त्याच्याकडून मित्रनगर येथे केलेल्या चोरीतील १०० टक्के रिकव्हरी करण्यात आली तर महादेव स्विट होममधून चोरलेल्या ११ हजारापैकी ८ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपीला शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे एम.जी. टिपरसे हे करत आहेत. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संतोष जोंधळे, उबाळे, तांदळे, कदम, गायकवाड, कोरडे, कातखडे, वंजारे आणि गर्जे यांनी केली.

Most Popular

error: Content is protected !!