Friday, May 20, 2022
No menu items!
Homeबीडधारूरधारुर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचे निकाल घोषित तीन भाजपा ,दोन राष्ट्रवादी तर एक...

धारुर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचे निकाल घोषित तीन भाजपा ,दोन राष्ट्रवादी तर एक संमिश्र


किल्ले धारूर (रिपोर्टर) – धारुर तालुक्यातील जहागिरमोहा, रुई धारूर, भोपाळ व कासारी या ठिकाणच्या ग्रामपंचायतींचे निकाल आज येथील तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आले.त्यात जहागिरमोहा प्रभाग क्रमांक एक मधून अनुसूचित जमाती या प्रवर्गातील कोंबडे बंडू बाबुराव यांनी 350 मते घेऊन विजय मिळवला तर कांदे आशाबाई संजय 352 मध्ये घेऊन विजयी झाल्या आहेत तसेच सर्वसाधारण स्त्री राखीव मधून शिंदे  रूक्मीनबाई अभिमान 303 घेऊन विजयी झाल्या आहेत. दुसर्‍या फेरीत सर्वसाधारण प्रवर्गातून रब्बानी अब्दुल रहमान 322 मते घेऊन विजयी झाले आहेत तसेच अनुसूचित जमाती स्त्री राखीव प्रवर्गातून बिल्पे शिवकन्या वसुदेव 402 मते घेऊन विजयी झाले आहेत तिसर्‍या फेरीत सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गातून राठोड तुळसाबाई बाजीराव 326 मते घेऊन विजयी झाले.


     तालुक्यातील भोपा ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे चाटे रविराज प्रभाकर 178 मते घेवून विजयी झाले आहेत सर्वसाधारण प्रवर्गातून वाघचौरे प्रवीण इंद्रजित 178 मते घेवून विजयी झाले सर्वसाधारण स्त्री राखीव प्रभागातून वाघचौरे मीराबाई अशोक 186 मते घेवून विजयी झाले आहेत. दुसर्‍या फेरीत अनुसूचित जमाती प्रवर्गातून गायकवाड गोविंद प्रकाश 216 घेऊन विजयी झाले आहेत स्त्री राखीव गटातून तिडके सुरेखा अंकुश 189 सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गातून वाघचौरे संगीता ईश्वर 204 मते घेऊन विजयी झाले आहेत तिसर्‍या फेरीत सर्वसाधारण प्रवर्गातून वाघचौरे सुग्रीव ज्ञानोबा 182 मते घेऊन विजयी झाले आहेत  अनुसुचित जाती स्त्री राखीव प्रवर्गातून पट्टेकर मीना गणेश 200 मते घेवून विजयी सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गातून शेख आयशा मन्सूर 141 मते घेवून विजयी तर तालुक्यातील रुई धारूर ग्रामपंचायती निकाल पुढील प्रमाणे भागवत नाना गिरी 293 मते घेवून विजयी, सर्वसाधारण स्त्री राखीव प्रभातून अर्चना बालासाहेब सोळंके 334 मते घेऊन विजयी झाल्या आहेत दुसर्‍या फेरीत अनुसूचित जाती या प्रवर्गातून काशिनाथ गोविंद गायकवाड 240 मते घेऊन विजयी झाले सर्वसाधारण प्रवर्गातून बालासाहेब श्रीराम सोळंके 254 मते घेवून विजयी सर्वसाधारण स्त्री राखीव मनीषा दिनकर तिडके 272 मते घेऊन विजयी तर तिसर्‍या फेरीत सर्वसाधारण प्रवर्गातून गणपती दामोदर नांदुरे 299 मते घेऊन विजयी अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून प्रभावती मदन गायकवाड 330 मते घेऊन विजयी महिला प्रवर्गातून सुनिता विजय राठोड 337 मते घेऊन विजयी तर कासारी ग्रामपंचायतीचा निकाल पुढीलप्रमाणे अनुसूचित जमाती प्रवर्गातून सोनवणे सिद्राम कोंडीबा 271 मते घेऊन विजयी झाले आहेत सर्वसाधारण प्रभागातून बडे सदाशिव महादेव 326 मते घेऊन विजयी झाले आहेत

सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गातून बडे अप्रोगाबाई सूर्यकांत 339 मध्ये घेऊन विजयी झाले आहेत दुसर्‍या फेरीत बडे सुनंदा महादेव 363 मते घेवून विजयी तर सर्वसाधारण प्रवर्गातून बडे बाबासाहेब आश्रुबा 332 मते घेऊन विजय सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून घुले अलका नामदेव 350 मते घेऊन विजयी तसेच  कासारी तिसर्‍या फेरीत सर्वसाधारण प्रवर्गातून सय्यद सुभान रमु 324 मते घेऊन विजयी महिला प्रवर्गातून बडे राणी बाई ज्ञानोबा 389 मते घेवून विजयी सर्वसाधारण स्त्री राखीव प्रवर्गातून बडे सत्यभामा नामदेव 348 मते घेऊन विजयी  तर चौथी फेरी मध्ये स्त्री राखीव प्रवर्गातून उघडे पूजा धम्मपाल 173 मते घेवून विजयी  राखीव प्रवर्गातून जाधव गिराजबाई प्रभू 166 मते घेवून विजयी तसेच विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली होती अतिशय शांततेत चारही ग्रामपंचायतीचे निकाल घोषित करण्यात आले निवडणूक विभागाचे नियोजन नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले होते तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी ठेवला होता.

Most Popular

error: Content is protected !!