Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeबीडपरळीपरळीच्या सहाही ग्रा.पं. धनंजय मुंडेंच्या ताब्यात

परळीच्या सहाही ग्रा.पं. धनंजय मुंडेंच्या ताब्यात


परळी (रिपोर्टर)- परळी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानानंतर आज मतमोजणी दरम्यान सहाही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सह राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे समर्थकांचा मोठा विजय झाला आहे. विजयी उमेदवारांसह समर्थकांनी जगमित्रच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सव साजरा केला.
   परळी तालुक्यातील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपूर, रेवली, वंजारवाडी, भोपळा या सात ग्रामपंचायतींसाठी निवडणुका लागल्या होत्या. यामध्ये रेवली, वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध होत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या. तर लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपूर या ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला. भोपळा ही ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात गेली. विजयी उमेदवारांनी जगमित्र या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात विजयोत्सव साजरा केला.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!