पाटोदा ( रिपोर्टर ) पाटोदा तालुक्यातील एकुण नवु ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या असुन यातील बहुतांशी ग्रामपंचायत आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आल्या असल्याचे समजते.
पाटोदा तालुक्यातील नवु ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या असुन यामध्ये पारगांव घुमरा, ढाळेवाडी, दासखेड, निरगुडी, खडकवाडी, काकडहीरा, आनपटवाडी, बेदरवाडी, उंखडा या ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या असुन आज निकाल जाहीर झाला असुन यामध्ये बहुसंख्य ग्रामपंचायत आमदार सुरेश धस यांच्या ताब्यात आल्या असल्याचे समजते.यामध्ये ढाळेवाडीत सभापती तात्यासाहेब हुले यांच्या गटाचे चार तर शाम हुले गटाचे तीन,खडकवाडी संजय सानप यांच्या कडे,पारगांव घुमरा हरिबप्पा घुमरे यांच्या गटाचे पाच तर भोसले गटाचे तीन व दिपक घुमरे गटाचे एक,दासखेड मा.सभापती केशव रसाळ गटाचे सात तर युवराज कोकाटेचे तीन तर शिवराज कोकाटेचे एक,उंखडा झुनगुरे गटाचे पाच तर ड प्रकाश कवठेकर गटाचे दोन,काकडहीरा येथे ड विनोद जायभाय गटाचे आठ तर महादेव जायभाय गटाचे एक,बेदरवाडी हारी काशिद गटाचे सात,निरगुडी हानु शेलार चार तर संतोष बेद्रे पाच व आनपटवाडी गणेश भोसले,घुमरे बडे गटाचे सात मा.सभापती अनिल जायभाय गटाचे झीरो असे उमेद्वार निवडुन आले आहे.