Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईममाजलगावमधील दोघांचे अंबाजोगाईत मृतदेह

माजलगावमधील दोघांचे अंबाजोगाईत मृतदेह


एकाचा पाण्यात बुडून मृत्यू तर दुसर्‍याचा कोरड्या विहिरीत आढळला मृतदेह
अंबाजोगाई (रिपोर्टर)- स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या पाठीमागील परिसरात असलेल्या तळ्याच्या पाण्यात बुडून ३८ वर्षीय इसमाचा आज सकाळी मृत्यू झाला. तर काल महाराष्ट्र बँक जवळ असलेल्या एका विहिरीत मिळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटली असून सदरचा इसम हा माजलगावचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. माजलगाव तालुक्यातील दोघांचे मृतदेह अंबाजोगाई शहरात मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.

140727171 227355892402379 2335334230705016620 n


अंबाजोगाई शहरातील महाराष्ट्र बँकेजवळ असलेल्या एका विहिरीत मृतदेह काल आढळून आला होता. सदरच्या इसमाचा मृत्यू दोन-तीन दिवसांपुर्वी झाला असावा, असा कयास काढून त्याची ओळख पटवण्यात येत होती. सदरचा व्यक्ती हा माजलगाव शहरातील कठाळू जाफर शेख असल्याचे सांगण्यात येते. सदरच्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? त्याचा मृतदेह अंबाजोगाई येथील विहिरीत कसा आला ? तो माजलगाव येथून अंबाजोगाईला का आला? असे एक ना अनेक प्रश्‍न पोलिसांसमोर उपस्थित असतानाच आज सकाळी माजलगाव तालुक्यातील पवारवाडी येथील अंकुश चव्हाण या ३८ वर्षीय इसमाचा स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या पाठीमागे एका तळ्यामध्ये मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत अंकुश चव्हाण याच्या नात्यातील व्यक्ती रुग्णालयामध्ये उपचार घेत असल्यामुळे तो त्या ठिकाणी होता. सकाळी तो अंघोळीसाठी रुग्णालयाच्या पाठीमागे गेला. तळ्याची खोली माहित नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शी सांगण्यात येते.

Most Popular

error: Content is protected !!