Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमआष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

आष्टीत पिस्टलधारी तरुण जेरबंद

अवैध पिस्टल बाळगणार्‍यांविरोधात मोहीम उघडा
बीड (रिपोर्टर)- जिल्ह्यात वाळू माफियागिरीसह गुटखा, मटका या माफियांनी उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात अनेक जणांकडे अवैध पिस्टल, कट्टे खुलेआम असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत असताना गुन्हे अन्वेषण विभागाने काल आष्टी-नगर रोडवर अवैध पिस्टल घेऊन फिरणार्‍या एका ३० वर्षीय युवकाच्या मुसक्या बांधत त्याच्या जवळील अवैध पिस्टल ताब्यात घेतले. त्या पिस्टलच्या मॅगझिनमध्ये गोळ्या असल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात बीड, गेवराई, परळी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध पिस्टल असल्याचे यापुर्वीच सांगण्यात आले आहे. आता पोलिसांनी अवैध पिस्टल वापरणार्‍यांकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.
रामचंद्र शिवाजी जाधव (वय ३०, रा. वट्टणवाडी ता. आष्टी) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे. तो आष्टी-नगर रोडवरील धोंडे यांच्या हॉटेलसमोर अवैध पिस्टल घेऊन फिरत होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्या ठिकाणी पेट्रोलिंगसाठी गेलेले एपीआय विजय गोसावी यांनी त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे अवैध पिस्टल मिळून आली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल केला. सदरील कारवाई स्था.गु.शा.चे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ए.पी.आय. विजय गोसावी, कदम, दुबाले, शिंदे यांनी केली.आष्टीमध्ये झालेल्या या कारवाईनंतर जिल्ह्यात अवैध पिस्टल वापरणार्‍यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत असून वाळू माफिया, मटका, गुटखा यासह अन्य अवैध धंद्यात माफियागिरी करणारे मोठ्या प्रमाणात विनापरवाना पिस्टल, कट्टे वापरत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असतात. त्यात रात्री झालेल्या या कारवाईने या तक्रारीला पुष्टी मिळाली असून पोलिसांनी आता अवैध पिस्टल वापरणार्‍यांविरोधात मोहीम उघडावी.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!