• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

शेतकर्‍यांचा आक्रोष,धनंजय मुंडे आक्रमक, विमा लागु असलेल्या सर्व पिकांना 25 टक्के अग्रिम मदत द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी; प्रशासन आणि विमा कंपनीच्या गोंधळामुळे फक्त 16 मंडळांना अग्रिम मंजूर, शेतकर्‍यांच्या सोशल मिडीयावरील ट्रेडिंगमध्ये मुंडे सहभागी, आंदोलनाचा इशारा

by Beed Reporter
September 13, 2022
Reading Time: 1 min read
0
बार्टी मार्फत यूपीएससी पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत 100 ने वाढ करण्याचा निर्णय – धनंजय मुंडे
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

बीड/मुंबई (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील सोयाबीनसह विमा लागू असलेल्या विविध पिकांचे रँडम सर्वेक्षण करून जिल्ह्यातील 63 पैकी 16 महसुली मंडळांमधील सोयाबीन पिकविमा धारक शेतकर्‍यांना 25% अग्रीम पीकविमा मंजूर करण्यात आला असून, सोयाबीनसह मागील तीन महिन्यात कमी अधिक पावसाने व किडींच्या विविध प्रादुर्भावाने नुकसान झालेल्या व पीकविमा लागू असलेल्या कापूस, तूर, मूग, उडीद आदी सर्वच पिकांना सर्वच महसुली मंडळांमध्ये 25% अग्रीम विमा मंजूर करण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे.
जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात बीड जिल्ह्यात सर्वदूर काही निवडक गावे वगळता पावसाने महिनाभर उघडीप दिली होती, या काळात ऐन जोमात आलेली पिके करपु लागली. त्यातच अंबाजोगाई व अन्य काही भागात गोगलगायी व अन्य किडींच्या प्रादुर्भावाने शेतकर्‍यांना दोन-तीन वेळा पेरण्या करायला भाग पाडले. बालाघाटच्या डोंगर रांगातील बहुतांश भागात अजूनही पाऊसच नाही. त्यामुळे अपेक्षित उत्पादनात प्रचंड मोठी घट येणार असल्याचे स्पष्ट आहे.
अतिवृष्टी व अन्य नैसर्गिक आपत्तीपोटी दिलेल्या मदतीतून बीड जिल्हा यापूर्वीच वगळण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांच्यासह लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांनी उत्पादनातील घट विचारात घेत अग्रीम पीकविमा मंजूर करण्याची केलेली मागणी विचारात घेत प्रशासनाने जिल्ह्यात रँडम सर्वेक्षण केले. मात्र या सर्वेक्षणाचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित विमा कंपनीने 63 पैकी केवळ 16 महसुली मंडळांमध्ये सोयाबीन पिकासाठी अग्रीम 25% विमा मंजूर केला आहे. या प्रकारामुळे बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून, शेतकर्‍यांचा आक्रोश सोशल मीडियावर देखील ट्रेंडिंग आहे. यालाच अनुसरून धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना एक पत्र लिहिले असून, त्यांनी प्रशासनाने केलेल्या रँडम सर्वेक्षणावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. जिल्ह्यातील 63 महसुली मंडळांमध्ये मागील तीन महिन्यात वेगवेगळ्या स्वरूपात नुकसान झाले असून, प्रशासनाने सर्वेक्षण करताना गांभीर्य बाळगले नसल्याचे व त्याचा फटका शेतकर्‍यांना बसला असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
बीड जिल्ह्यातील सर्वच महसुली मंडळांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. उत्पादनात 50% पेक्षा अधिक घट होणार हे स्वयंस्पष्ट आहे. मात्र जिल्हा प्रशासन व संबंधित विमा कंपनीने सर्वेक्षणाच्या नावावर घातलेला घोळ अक्षम्य असून, शेतकर्‍यांमध्ये यामुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्हा प्रशासन व संबंधित विमा कंपनीला आवश्यकता असल्यास तातडीने पुन्हा फेर सर्वेक्षण करावे व सर्व 63 महसुली मंडळांमधील सोयाबीन सह कापूस, तूर, मूग, उडीद यांसह विमा लागू असलेल्या सर्वच पिकांना 25% अग्रीम विमा मंजूर करून वितरित करण्यासाठी सर्व संबंधितांना आदेश द्यावेत, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे. सरसकट 25% अग्रीम विम्यासह शेतकर्‍यांना विशेष मदतीच्या प्रश्नाचे सरकारने तात्काळ समाधान नाही केले तर शेतकर्‍यांच्या रोषाला सरकारला सामोरे जावे लागेल, असे म्हणत धनंजय मुंडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा ईशारा देखील दिला आहे. यासंदर्भात आपण प्रसंगी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून, 25% अग्रीमसह गोगलगायीनी नुकसान केलेल्या शेतकर्‍यांना विशेष मदत, ऊसतोड कामगारांची नोंदणी पुन्हा सुरू करणे आदी विषयांवर चर्चा करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

Previous Post

राधाबिनोद शर्मा, शेतकर्‍याचं धन वाचवा; लंम्पीची दहशत, शेतकर्‍यात भिती, लसीचा तुटवडा, प्रशासन सुस्त

Next Post

प्रखर- काँग्रेसची यात्रा अन, पवार, नितीश यांची भेट!!

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
प्रखर- काँग्रेसची यात्रा अन, पवार, नितीश यांची भेट!!

प्रखर- काँग्रेसची यात्रा अन, पवार, नितीश यांची भेट!!

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?