Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeक्राईमबीड ग्रामीण पोलीसांची जुगार अड्‌ड्यावर धाड आठ जणांविरोधात कारवाई

बीड ग्रामीण पोलीसांची जुगार अड्‌ड्यावर धाड आठ जणांविरोधात कारवाई

५ मोबाईल,४ मोटरसायकल जप्त
बीड (रिपोर्टर):- घोसापुरी शिवारामध्ये तिरट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती बीड ग्रामीण पोलीसांना झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी धाड टाकली. पोलीसांनी आठ जुगार्‍यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडील २८ हजार ८०० रूपये, ५ मोबाईल, ४ मोटरसायकल जप्त केल्या.
घोसापुरी येथील पकडलेल्या जुगारामध्ये संदिप पालके, मोहम्मद अफजल, मनोज नेवडे, मुबीन खान, रिझवान सिद्दीकी, सुनिल सौदा, रविंद्र जैन, गणेश पवार रा.सर्व बीड यांचा समावेश होता. या जुगार्‍याकडून २८ हजार ८०० रूपये, ५ मोबाईल, ४ मोटरसायकल असा माल जप्त करण्यात आला. ही कारवाई पीएसआय पवनसिंग राजपुत, रविंद्र जाधव, किशोर राऊत, येडे, म्हेत्रे, ढाकणे यांनी केली. या प्रकरणी पीएसआय पवनसिंग राजपुत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास किशोर राऊत हे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!