परळी (रिपोर्टर) शिक्षकाने वर्गात जाऊन आठवीच्या विद्यार्थ्यांना छडीने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना शहरातील श्री नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात घडली आहे. याबाबत संबंधित शिक्षकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
परळी शहरातील वडसावित्री नगर भागात मराठवाडा ऊसतोड कामगार मंडळ परळी वै. संचलित श्री नागनाथ निवासी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे. दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी त्याच शाळेतील शिक्षक बालाजी लक्ष्मण ङ्गड आठवीच्या वर्गात गेले असता विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात सेेव ोीपळपस सर म्हणल्याने ङ्गड यांनी विद्यार्थ्यांच्या हातावर छडीने जबर मारहाण केली. मारहाण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी बाहेर रडत येत मुख्याध्यापक यांना झालेला प्रकार सांगितला असता याबाबत ङ्गड यांना जाब विचारला असता त्यांनी मोठ्या आवाजात सेेव ोीपळपस म्हणल्या कारणाने मारहाण केली असल्याचे सांगितले.
संबंधित शिक्षकाने यापूर्वी ही असेच विद्यार्थ्यांना मारहाण तसेच अर्वाच भाषेत बोलण्याची घटना घडली असून ङ्गड यांना सांगूनही त्यांच्या वागण्यात काही बदल होत नसल्याने शालेय प्रशासन, विद्यालयातील कर्मचारी आणि विद्यार्थी परेशान आहेत. या प्रकारची तक्रार मुख्याध्यापक यांनी अध्यक्षांकडे केली. अध्यक्षांनी शिक्षकास विद्यार्थ्यांना मारहाण का केली अशी विचारणा केली असता त्यांनाही धक्काबुक्की केली अशी ङ्गिर्याद संस्थेचे अध्यक्ष भिमराव सातभाई यांनी दिल्यावरून शहर पोलिस ठाण्यात सशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिक्षकाने केलेल्या मारहाणीत एका विद्यार्थ्याच्या हाताला जास्त मार लागला असुन त्याला अंबाजोगाईला पाठवले आहे.