Sunday, July 25, 2021
No menu items!
Homeमहाराष्ट्रमराठवाडाबीड, नगर पाठोपाठ धनंजय मुंडे यांचे औरंगाबादमध्येही जंगी स्वागत!

बीड, नगर पाठोपाठ धनंजय मुंडे यांचे औरंगाबादमध्येही जंगी स्वागत!

औरंगाबाद -ऑनलाईन रिपोर्टर

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे बीड, अहमदनगर पाठोपाठ आज औरंगाबाद येथील चिकलठाणा चौकात हजारोंच्या उपस्थितीत जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दत्ता भांगे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड आतिषबाजी करत, वाजत गाजत क्रेन ने शेकडो किलोचा हार घालून आपल्या लाडक्या नेत्याचे स्वागत केले.

धनंजय मुंडे आज बीड जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन समितीच्या बैठकीस बीड जिल्हा दौऱ्यावर आले असता, मुंबईकडे परतीच्या प्रवासाला औरंगाबाद मार्गे निघाले होते. यावेळी चिकलठाणा येथील चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या उत्साहात हजारोंच्या संख्येने मुंडेंचे जंगी स्वागत केले.

चिकलठाणा चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास मुंडेंनी सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मोठ्या उत्साहात असलेल्या कार्यकर्त्यांच्या वलयाला मुंडे सामोरे गेले.

पुष्पहार, फेटे, पुष्पगुच्छ आणि कार्यकर्त्यांची तोबा गर्दी औरंगाबाद विमानतळावर देखील तेवढ्याच उत्साहात दिसत होती. यावेळी धनंजय मुंडे यांनी या प्रेमाबद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Most Popular

error: Content is protected !!