बीड (रिपोर्टर) राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे आज बीड शहरामध्ये आले असून ते शहरात आयोजीत करण्यात आलेल्या शिव-सैनिकांच्या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सावंत यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील 102 बेडच्या आयसीयु वॉर्डचा लोकार्पण सोहळा होणार आहे.
शिंदे गटाचे तथा राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. आज दुपारी त्यांचे शहरात आगमन झाले. चर्हाटा फाट्यावर काही कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर सावंत हे शहरामध्ये शिवसैनिकांनी आयोजीत केलेल्या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. सदरील ही बैठक बार्शी रोडवर असलेल्या हॉटेल गोल्डन चॉईस या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आरोग्यमंत्री जिल्हा रुग्णालयातील 102 बेडच्या आयसीयुचे लोकार्पण करणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या बेडचे काम सुरू होते. लोकार्पण सोहळा झाल्यानंतर उद्यापासून हे बेड रुग्णांसाठी उपलब्ध राहतील. सावंत यांच्या समवेत माजी मंत्री सुरेश नवले, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचीन मुळुक यांच्यासह आदी शिंदे समर्थक उपस्थित होते.