• Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
  • Login
Upgrade
Beed Reporter
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल

    मोठी बातमी – राज्यातील दुकानं, हॉटेल्स 24 तास खुली राहणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

    संपूर्ण भारतभर,दर्जेदार सेवा, वेळेत वितरण ग्राहकांना Whyt one ची पसंती.

    Whyt One ब्रँड्स ने दिला  स्टाइलला आधुनिक टच.

    money 2022

    दर 30 तासात एक अब्जाधीश, दर 33 तासांमध्ये 10 लाख गरिबांची भर; विषमतेची दरी वाढली

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    सव्वा लाखाची छत्री पण पावसापासून संरक्षण नाही, Gucci-Adidas च्या छत्रीची चीनमध्ये चर्चा

    Trending Tags

    • Pandemic
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर
No Result
View All Result
Beed Reporter
No Result
View All Result
Home बीड

विषारी भगर विक्रेत्यांनी दुकानाबाहेर काढली; अन्नभेसळ प्रशासनाच्या हाती दुकानातून विषारी भगरीचे सॅम्पल नाही; लोकांकडून तीन सॅम्पल मिळाले; ९० क्विंटलपेक्षा जास्त भगर जप्त;

by Beed Reporter
September 27, 2022
Reading Time: 1 min read
0
विषारी भगर विक्रेत्यांनी दुकानाबाहेर काढली; अन्नभेसळ प्रशासनाच्या हाती दुकानातून विषारी भगरीचे सॅम्पल नाही; लोकांकडून तीन सॅम्पल मिळाले; ९० क्विंटलपेक्षा जास्त भगर जप्त;
0
SHARES
Share on FacebookShare on TwitterShare on Whatsapp

दोन एजन्स्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली
बाधीत रुग्णांची संख्या वाढली; तीनशेपेक्षा अधिक जणांवर उपचार सुरू
बीड (रिपोर्टर) बीडसह गेवराई तालुक्यातील काही गावांमध्ये भगरीतून विषबाधा होऊन शेकडो बाधीत रुग्णालयात उपचारासाठी डेरेदाखल झाल्यानंतर केवळ गुटख्याच्या हपत्यात दंग असलेल्या अन्न व औषध प्रशासन खडबडून जागे झाले अन् ग्रामीण भागातील दुकानासह मोंढा भागातील दुकानावर छापे मारले असता ज्या भगरीतून विषबाधा जाली ती भगरच संपल्याचे दुकानदाराने सांगितल्याने दुकानदारांनी ती भगर गायब केल्याचे बोलले जाते. मात्र प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने शहरातील मोंढा भागात असलेल्या ओम एजन्सी आणि आशीर्वाद एजन्सी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली अन्न व औषध प्रशासनाने सुरू केल्या असून रात्रीतून तब्बल ९ हजार ६०० किलो भगर जप्त करण्यात आली आहे. ३०० बाधित रुग्णांवर बीड जिल्हा रुग्णालयासह अन्य रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

याबाबत अधिक असे की, नवरात्राचे उपवास सुरू झाल्याने उपवासाच्या साहित्याची मागणी वाढली. बीड आणि गेवराई तालुक्यात अनेकांनी भगर खरेदी केली. सदरच्या भगरीमधून काल गेवराई आणि बीड तालुक्यातील काही गावात विषबाधा झाली. शेकडोंवर बाधीत रुग्ण उपचारासाठी शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयामध्ये डेरेदाख होत गेले. या घटनेची माहिती कळताच अन्नभेसळ विभागाच्या अधिकार्‍यांनी कोळवाडी येथील किराणा दुकानावर छापा मारला. त्यावेळी दुकानदाराने सदरची भगर संपल्याचे सांगितले आणि ती भगर आशीर्वाद एजन्सी आणि ओम एजन्सी बीड येथून आणल्याचे सांगितले. अन्नभेसळ विभागाने बीड येथेही रात्री उशीरा छापा मारला. मात्र या दोन्ही एजन्सीच्या मालकाने संबंधित भगर संपल्याचे घोषीत केले. घटना घडल्यानंतर या एजन्सीज्‌नी भगर लंपास केल्याचे बोलले जाते मात्र अशा स्थितीतही रात्रीतून ९ हजार ६०० किलो म्हणजेच ९० क्विंटलपेक्षा जास्त भगर जप्त करण्यात आली. या प्रकरणी अन्नभेसळ विभागाने या दोन्ही एजन्सीज्‌वर गुन्हे दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे भगरीतून विषबाधा झालेल्या लोकांच्या संख्येत वाढ होत आहे.

बीड तालुक्यातील नाळवंडी, शहरातील शाहूनगर, गेवराई तालुक्यातील मालेगाव, बीड जवळील पाली, कोळगाव, नाळवंडी, जुजगव्हाण, कपिलधारवाडी, शास्त्रीनगर, गांधीनगर यासह अन्य परिसरातील जवळपास तिनशे जणांना विषबाधा झाली. यातील ८० ते ८५ रुग्ण हे जिल्हा रुग्णालयात दाखल आहे तर इतर रुग्ण शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्यासह डॉ. शिरीष गुट्टे, डॉ. सुधीर राऊत, डॉ. सोनाली सानप सह आदी डॉक्टर व कर्मचार्‍यांनी जिल्हा रुग्णालयातील रुग्णांवर उपचार केले. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शिरूर तालुक्यामध्येही काही जणांना भगरीतून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.

सुट्टी भगर खाऊ नका
विविध कंपनीच्या भगरी बाजारात आहेत. त्यावर आयएसआयचा मार्क आहे. अशी भगरच खरेदी करा, सुट्टी भगर खरेदी करताना काळजी घ्या, अशा भगरीतून विषबाधा होण्याची शक्यता दाट असते, असे अन्नभेसळचे सय्यद इमरान हाशमी यांनी सांगितले. स्वत:च्या आरोग्यासाठी तडजोड न करता भगर ही सुट्टी घेऊ नका, कुठे काही अस्वच्छ अथवा निकृष्ट साहित्य अन्न-धान्य, किराणा कोणी विक्री करत असेल तर त्याची माहिती प्रशासनाला द्या. काल ज्या नागरीकांनी भगर खरेदी केली त्या नागरिकांनी ती भगर खाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकार्‍यांची रुग्णालयाला भेट
भगर खाऊन विषबाधीत झालेले रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज दुपारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्हा रुग्णलायात येऊन रुग्णांबाबतची माहिती जिल्हा शल्यचिकित्सांकडून जाणून घेतली व रुग्णांची विचारपूस केली.

Previous Post

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्‍वर चव्हाण यांना पितृशोक

Next Post

शिवसेना कुणाची? खंडपीठासमोर युक्तीवाद सुरू; ठाकरे गट म्हणाले, फुटीर गटाने राजकीय पक्षात विलीन व्हावे, शिंदे गट म्हणाले पक्षाचं चिन्ह म्हणजे आमदारांची संपत्ती नाही

संबंधित बातम्या

अग्रलेख

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

by गणेश सावंत
June 26, 2026
कटाक्ष

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

by गणेश सावंत
June 24, 2026
केज

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

by गणेश सावंत
June 23, 2026
अंबाजोगाई

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

by गणेश सावंत
June 23, 2026
क्राईम

गोतस्करी व पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या तीन आरोपींना केले जेरबंद

by गणेश सावंत
June 23, 2026
Next Post
‘ऑगस्टक्रांती’ शिवसेना कोणाची?; ठाकरेंच्या सेनेची 1 ऑगस्टला सुनावणी

शिवसेना कुणाची? खंडपीठासमोर युक्तीवाद सुरू; ठाकरे गट म्हणाले, फुटीर गटाने राजकीय पक्षात विलीन व्हावे, शिंदे गट म्हणाले पक्षाचं चिन्ह म्हणजे आमदारांची संपत्ती नाही

ताज्या बातम्या

अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता

June 28, 2026

कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा

June 26, 2026

कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

June 24, 2026

संतापाचा कडेलोट, केज बंद, मृतदेहावर अंत्यसरकार नाही, संतप्त नागरिकांचा ठिय्या, अॅम्ब्युलन्स फोडली, मास्टरमाइंड शोधा

June 23, 2026

शेतकर्‍यांचा रस्त्यावर आक्रोश, दोन तास वाहतूक ठप्पकर्जमाफी, खत दरवाढ, पिकविम्यासाठी अंबाजोगाई-लातूर रस्ता रोखला

June 23, 2026

Categories

  • beed
  • Uncategorized
  • अग्रलेख
  • अंबाजोगाई
  • आष्टी
  • कटाक्ष
  • करिअर
  • केज
  • कोरोना
  • क्राईम
  • गेवराई
  • थेट सवाल
  • देश विदेश
  • धारूर
  • परळी
  • फूड
  • फॅशन
  • बीड
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • महाराष्ट्र्राचे महाभारत
  • माजलगाव
  • राजकारण
  • रोखठोक
  • लाइफस्टाइल
  • लोकसभा २०२४
  • वडवणी
  • व्यापार
  • संपादकीय
  • स्पोर्ट्स
  • हेअल्थ

Browse by Tag

beed beed police bjp cmo maharashtr gold price ipl2022 job2022

Recent Posts

  • अग्रलेख-फुटीची महामारी,मौनातली सत्ता
  • कटाक्ष -जिथे सत्तेचा माज, तिथे गुंडांची भाषा
  • कटाक्ष-‘नया है यह’‘काय रे तुझी भाषा’

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Home
  • बीड
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • कोरोना
    • गेवराई
    • धारूर
    • परळी
    • माजलगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • देश विदेश
  • लाइफस्टाइल
  • व्यापार
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • ई-पेपर

© 2022 Dainik Beed Reporter - Powered by Ashvamedh Software-9975208920.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?