बीड (रिपोर्टर) दुचाकी आणि आयशर टेम्पोचा समोरासमोर अपघात होवून दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी २ च्या दरम्यान बीड बायपासवरील संभाजी चौकात घडली.
केजकडील दाम्पत्य आपली दुचाकी क्र.एम.एच.२३ एल.१५८४ वरून केजकडे जात होते. संभाजी चौकामध्ये आयशर टेम्पो क्र.एम.एच.१५ एफ.व्ही. १८४७ आणि दुचाकीची समारोसमोर धडक होवून झालेल्या भिषण अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळताच घटनास्थळी बीट अमलदार मस्के यांच्यासह ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. हे दोघे मयत दाम्पत्य केजचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येते.