’सपा’च्या मदतीने राज्यसभेवर जाणार
नवी दिल्ली (वृत्तसेवा) कपिल सिब्बल हे काँग्रेसमधील ॠ-23 या गटाचा भाग होते. गेल्या काही काळापासून ते पक्षाच्या ध्येयधोरणांवर नाराज होते. कपिल सिब्बल यांनी कोणालाही पत्ता लागू न देता काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. काहीवेळापूर्वीच त्यांनी यासंदर्भात घोषणा केली. कपिल सिब्बल हे आता अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाची मदत घेऊन राज्यसभेवर जाणार आहेत. त्यांनी अनेकदा जाहीरपणे आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणार्या काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता. काँग्रेसमध्ये गांधी घराण्याऐवजी सामूहिक नेतृत्त्व असावे, हे मत त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते.