Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीड९४ जागेसाठी १२०० अर्ज आले

९४ जागेसाठी १२०० अर्ज आले

बीड (रिपोर्टर):- वीज वितरण कंपनीमध्ये वीज तंत्री, तार तंत्र यासाठी जागा भरायच्या आहेत. यासाठी एकूण १२०० अर्ज आतापर्यंत दाखल झाले होते. कागदपत्र पडताळणीची तारीख आज आणि उद्याची शेवटची आहे.
वीज वितरण कंपनीमध्ये वीज तंत्री आणि तारतंत्री यासाठी जागा रिक्त असल्याने एकूण ९४ जागा भरावयाच्या आहेत. जागा भरण्यासंदर्भात वीज वितरण कंपनीकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाभरातील जवळपास बाराशे इच्छुकांनी आपले अर्ज वीज वितरण कार्यालयामध्ये दाखल केले होते. वीज तंत्रीसाठी कागदपत्र पडताळणीची तारीख आजची तर तारतंत्रीसाठी उद्याची तारीख पडताळणीची असल्याने संबंधित उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी कार्यालयात उपस्थिती दर्शविली होती.

Most Popular

error: Content is protected !!