Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeक्राईममहादेवला हवा वंशाला दिवा त्यासाठी राधेचा जीव का घ्यावा?

महादेवला हवा वंशाला दिवा त्यासाठी राधेचा जीव का घ्यावा?

मुलगी-मुलगा, स्त्री-पुरुष भेदभाव आणि त्यातून घडणार्‍या गुन्हेगारी कृत्याचा आलेख दिवसेन्‌दिवस वाढतच चालला आहे. त्यासाठी कधी स्वतः डॉक्टरच ’दानव’ होतात तर कधी आई- बाप, नातलगच कसाई बनतात. पुरोगामी महाराष्ट्रात ’दिव्याच्या दुराग्रहाने आतापर्यंत हजारो-लाखो पणत्या ’विझवल्या’. आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रिला खुपच मानाचा दर्जा दिला गेला. तिला मांगल्याचे आणि प्रेमाचे प्रतीक मानले गेले. तिने शेकडो वर्षांपासून अनेक आघाड्यांवर सामाजिक आणि राजकीय नेतृत्व करून आपले कतृत्व सिद्ध केल्याची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. महाभारतात वस्त्रहरण व्हावे इतकी ’ती’ दुर्बल नक्कीच नाही. मात्र केव्हा केव्हा ‘ती’ पतिच्या निर्दयी कृत्यापूढे हतबल होते. अन् त्याचा बळी ठरते. वंशाचा दिवा म्हणजे नेमकं काय? मुलगा जन्माला येणं म्हणजे तुमचा वंश पुढे जाईलच किंवा तो नेईलचं याची शाश्वती आजच्या घडीला कोण देवू शकतो? जर मुलानंच घरातून हाकलून दिलं तर… मग त्या ’मुलींचं’ काय ज्यांना तुम्ही एक मुलगा जन्माला येण्यासाठी मारलंत… ती असतांनाही ‘त्याच्यासाठी’ तुमच्या पत्नीला मारल त्याच काय? असाच एक घृणास्पद आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. कुटुंब नियोजन केेलेल्या पत्नीला आता मुल होणार नाही, शस्त्रक्रियासाठी मोठा खर्च लागणार या संतापातून मुलाचा हव्यास करणार्‍या नराधमाने स्वत:च्या पत्नीचे हातपाय बांधून रात्रभर बेदम मारहाण केल्याने मोठा रक्तस्त्राव होवून त्यात तिचा दुर्दैवी अंत झाल्याची संतापजनक घटना कडली.

crime dayri logo 2

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील सुनील राधाकिसन बागडे वय २४ वर्षे यांना एक राजू नावाचा भाऊ, आई शशिकलाबाई आणि तीन विवाहित बहिनी त्यापैकी एक राधा त्यांनी राधाचा विवाह गेल्या दहा वर्षापूर्वी गेवराई तालुक्यातील इरगाव येथील महादेव आसाराम रेडे यांच्याशी लावून दिला होता. लग्न झाल्यानंतर त्यांचा सुखी संसार सुरु झाला. ते मोलमजूरी करुन आपला संसार सांभाळत होते. दरम्यान औरंगपूर शिवारातील कल्याण डरपे यांच्या शेतात महादेव सालगडी म्हणून काम करु लागला. तर त्याची पत्नी मोलमजूरी करु लागली. सालगडी असल्यामुळे ते डरपे यांच्याच शेतात शेड मारुन राहूलागले. त्यांना शिवम आणि अश्विनी असे दोन आपत्य झाली. मुलगा अन् मुलगी झाल्याने त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले आणि ती शस्त्रक्रिया करून घेतली. मात्र त्यांच्या सुखी संसाराला कोणाची घरघर लागली अन् ८ वर्षाच्या शिवमच्या पोटात दुखत असल्याने दोन वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यामुळे त्यांना दुसरे अपत्य होणे शक्य नव्हते. अन् महादेवच्या मते त्याचा वंश बुडाल्याने तो बेचैन होत होता. सोन्यासारखी ४ वर्षाची लेक आश्‍विनी असतांनाही त्याल वंशाला दिवाच हवा होता. मात्र राधापासून आपल्याला वंशाचा दिवा मिळणार नाही. त्यामुळे तो तील त्रास देवू लागला. त्यात तो दारुच्या नशेत घरी येवून तिला रोज मारहान करायचा. माझा वंश वाढवायचा आहे. मला मुलगा हवा आहे. म्हणून तो राधासोबत रोज किटकिट घालायचा.मात्र राधाने त्याची समजूत काढत माझे ऑपरेशन पलटवू म्हणजे आपल्याला दुसर मुलं होईल. मात्र त्याला पैसे लागतील म्हणून तो शस्त्रक्रिया न करता दुसरं लग्न करणार म्हणत तिला मारहान करायचा. मात्र कुठल्या पत्नीला सवत घरात आलेली आवडेल म्हणून ती राधाला आवडावी. अन् त्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पलटून घेण्याचे ठरवले अन् एके दिवशी बीड येथील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये दोघेही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पलटविण्यासाठी दवाखान्यात आले. डॉक्टरांनी राधाला तपासून ३५ हजार रुपयांचा खर्च येईल असे सांगितले. त्या दिवशी ते परत गेले अन् दुसर्‍या दिवशी पुन्हा शस्त्रक्रिया करायची म्हणून वापस आले. डॉक्टरांनी तपासून काही स्टेस्ट करण्यासाठी सांगितल्या. तशी महादेवच्या डोक्यात टुब पेटली. आपण हिच्यावर ३५ हजार रुपये खर्च करायचा अन् ऑपरेशन होवूनही मुलगा झाला नाही तर? या विचाराने महादेवच्या मनात कल्लोळ माजला. डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशनची तारीख दिली आणि त्यासोबतच पैसेही सांगितले. ते दोघे घरी आले. घरी आल्यानंतर पत्नीशी भांडू लागला. कारण त्याला पैसेही खर्च करायचे नव्हते अन् वंशाचा दिवाही हवा होता.

26 02 2021 26


मुलाच्या हव्यासापोटी तो राधाला नेहमीच दारु पिवून मारहान करायचा मात्र राधा गप गुमान सहन करायची. ती शेतात राहत असल्याने शेजारी पाजारीही कोणी तिला मारु नका म्हणून सोडायला येत नसे. कधी तरी आपलं दुख: हलक करायला ती तिच्या आई- आणि भावाला फोन करुन सांगायची मात्र. ते तिची समजूत काढायचे आज ना उद्या परिस्थिती सुधारेल म्हणत तिला धिर द्यायचे. दि. ४ फेब्रुवारी २०२१ रोजी राधाने आपला भाऊ सुनिल याला फोन करून तिला मुलासाठी होत असलेल्या छळाविषयी माहिती दिली. भाऊ सुनील याने राधाला धिर देत आम्ही दोन-चार दिवसात पैशाची तजबीज करुन तुझ्याकडे येऊ (कारण सुनिल देखील मोल मजूरी करुन कुटुंबीयांचा गाडा हाकत होता) पाहुण्याला ही समजून सांगू असे म्हणाला. मात्र त्याच्या दुसर्‍याच दिवशी दि. ५ फेब्रुवारी २०२१ रोजी राधा ही चा भाचा माऊली मेधने याने राधाचा भाऊ सूनील बांगडे यांना फोन करून कळवले की मामीचे जास्त दुखत आहे. तुम्ही लवकर गाडी घेऊन या.

हे पण वाचा
दोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं! शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं
https://beedreporter.com/news/1907/

जसा फोन आला तसा बागडे कुटुंबीयाचा काळजाचा ठोका चुकला कारण राधाचा सासरी छळ सुरु होता. तिचा पती तिला बेधम मारहान करत होता. त्यात तिचे काही बरे वाईट तर झाले नाही ना? म्हणून सूनील बागडे, त्याची आई शशिकला, भाऊ राजू आणि नातेवाईक गाडी करुन इरगावच्या दिशेने निघाले तोच पुन्हा दुसरा फोन आला अन् बहिनीचा मृत्यू झाल्याची बातमी सुनिलच्या कानावर पडली. सूनील बागडे येतांना गेवराई पोलिसांना सोबत घेवूनच आले. गावकरी आणि नातेवाईकांनी राधाचा मृतदेह शवविच्छदनासाठी निपाणी जवळका येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणला होता. शेवविच्छदन झाल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेवून गेवराई येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यानंतर राधाचा भाऊ सुनील बांगडे आणि नातेवाईक इरगाव आणि राधा राहात असलेल्या औरंगपूर शिवारातील कल्याण डरपे यांच्या शेतात गेले. तेथे गेल्यानंतर राधा राहात असलेल्या शेतापासून अवघ्या काही अंतरावर दुसर्‍याच्या शेतात एक महिला राधा सारखीच कामासाठी राहत होती. तिने सुनिला सांगितले ती दि. ५ फेब्रवारी २०२१ रोजी ती राधा च्या घरी सकाळी साडेसात वाजता तिला कामाला बोलविण्यासाठी गेली असता तिला राधा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. राधाचे हातपाय बांधलेले होते तिच्या दोन्ही पायाच्या नडगीमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. तेव्हा त्या महिलेने राधाला विचारले ‘तुला कोणी मारले?’ ‘तुझे हातपाय कोणी बांधले?’ त्यावेळेस राधा म्हणाली ‘माझ्या नवर्‍याने मला हात-पाय बांधून मारले, मला तुम्ही लवकर दवाखान्यात घेऊन चला‘ मरणाच्या दारात असलेल्या राधाने त्या महिलेकडे मदतीची याचना मागितली अन् तिने तत्काळ शेतमालक आणि राधाच्या सासूला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. मात्र राधाची सासू आणि शेतमालक कल्याण डरते यांना येण्यासाठी उशीर झाला ते आल्यानंतर त्यांनी राधाची अवस्था पाहून रिक्षा बोलवला यामध्ये बराच वेळ गेल्याने अन् अधिक रक्तत्राव झाल्याने राधाची परिस्थिती बिघडत होती राधाला त्यांनी रिक्षात टाकले अन् दवाखान्यात घेऊन जात असतानाच तिने या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे त्यांनी रिक्षा दवाखान्यात न नेता इरगावला राधाच्या सासूच्या घरी नेला अशी माहिती त्या महिलेने राधाच्या भावाला दिल्यानंतर सुनीलने गेवराई पोलीस ठाणे गाठून याची फिर्याद देण्याचे ठरवले. गेवराई पोलीस घटनास्थळ पाहण्यासाठी गेले असता ते घटनास्थळ बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा लागणार असल्याने सुनील राधाकिसन बागडे (वय २४ वर्षे रा. चितेगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद) यांनी दि. ६ फेब्रुवारी २०२१ रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिसांनी महादेव आसाराम रेडे (वय ३५ वर्षे रा. इरगाव तालुका गेवराई) याच्याविरुद्ध गु. र. क्रमांक २३ / २०२१ कलम ३०२ भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करुन घेतला. गुन्ह्यातील आरोपी महादेव रेडे याला गेवराई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गेवराईत जावून आरोपीला अटक केले. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांनी अटकेतील आरोपी महादेव रेडे याला न्यायालयात हजर करून त्याची दि. ८ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कस्टडी घेतली. अन् तपासात उघड झाले की, दि. ४ फेब्रुवारी रोजी ११ वाजता राधाचे अन् त्याचे मुलगा हवा आहे म्हणून भांडण झाले. यावेळी शेतात ते दोघेच राहत होते. ११ वाजता त्याने राधाला मारहान केली. तिला मारहान केल्यामुळे ती मला तुमच्यासोबत राहायचे नाही. मी माझ्या माहेरी जाते म्हणाल्यामुळे महादेवला वाटले ही आता ही निघून जाईल म्हणून त्याने तिच्या स्कार्पने तिचे हात आणि साडीने घट्ट पाय बांधून टाकले. अन् जवळच पडलेला एक लाकडी दांडा ज्यावर तिन खनपट असलेला घेतला अन् एकाद्या सापला धोपटावे सते तो तिला बदाडू लागला. हात, पाय, पाट सोलून काढली. नडग्या फोडल्या पहाटे ५ वाजेपर्यंत तो दिला दारुच्या नशेत मारत होत अन् ति मदतीची याचना करत होती. घराबाहेर धंडीत कुडकुडत होती. मात्र शेतात एक घर असल्याने आरडा ओरडा करुन तिचा घसा कोरडा पडला मात्र तिचा आवाज ना शेजार्‍याला गेला ना त्या निर्दय पतीच्या काळजापर्यंत. ५ वाजता निर्दयी पतीने तिला बाहेरच ठेवून तो घरात झोपला. सकाळी ६ वाजता जाग आल्यानंतर त्याने तिला ओढत घरात आणले अन् घरातही मारहान सुरु केली. तेथे पुन्हा (मेलेल्या सापावर धोपाट्या घालाव्या तसा तो तिला मारु लागला) अन् साडे सहा वाजता तिला तसाच सोडून तो निघून गेला. मदतीची याचना करत रक्ताच्या थारोळ्यात ती तशीच साडेसात वाजेपर्यंत पडलेली होती. त्यानंतरही तिला ९ वाजेपर्यंत मदत न मिळाल्याने तिने अखेरचा श्‍वास घेतला…. घटना स्थळावरुन पोलिसांनी एक लाकडी दांडा त्यावर तीन खनपट असलेला ताब्यात घेतला. याच दांड्याने महादेवने पत्नी राधाला बेदम मारहान करुन खून केला होता. यासह अन्य पुरावे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. या संपूर्ण घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे हे करत असून त्यांना पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, डीवायएसपी संतोष वाळके, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तर पोलीस उपनिरिक्षक पवन राजपूत, पो.ह. पी.टी. चव्हाण, रवींद्र जाधव, किशोर राऊत यांचे सहकार्य मिळाले.

Most Popular

error: Content is protected !!