Saturday, October 16, 2021
No menu items!
Homeबीडकेंद्राच्या हुकुमशाहीला व्यापार्‍यांचा विरोध

केंद्राच्या हुकुमशाहीला व्यापार्‍यांचा विरोध


भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; बीड कडकडीत बंद, तालुक्याच्या ठिकाणासह अनेक गावच्या बाजार पेठा कडकडीत बंद
बीड (रिपोर्टर)- केंद्र सरकार जीएसटीच्या माध्यमातून पुन्हा एकदा हुकुमशाही राज आणण्याचा प्रयत्न करत आहे. जीएसटी कायद्यातील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात व इंधनाचे दर कमी करावे या प्रमुख मागण्यांसाठी आज देशभरातील व्यापार्‍यांनी बंदची हाक दिली. या बंदमध्ये बीड जिल्ह्यातील सर्व व्यापार्‍यांनी सहभाग नोंदवला. बीड शहरातील जालना रोड, सुभाष रोड, स्टेडियम परिसर यासह अन्य भागातील व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळला. तालुक्यातील व्यापार्‍यांनीही या बंदमध्ये सहभाग नोंदवला होता.

गेवराईमध्ये अल्पप्रतिसाद; केजमध्ये कडकडीत बंद

2 3


व्यापार्‍यांनी पुकारलेल्या आजच्या बंदमध्ये गेवराईत म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. काही व्यापार्‍यांनी आपले व्यवहार सुरू ठेवले होते तर काहींनी बंद ठेवले होते. केज शहरात मात्र सर्व व्यापार्‍यांनी आपआपले व्यापार बंद ठेवून देशव्यापी संपात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. आष्टी, पाटोदा, शिरूर, अंबाजोगाई परळी, माजलगाव येथील व्यापार्‍यांनी बंदमध्ये सहभाग घेतला होता.

धारूरमध्ये व्यापार्‍यांंनी
पाळला कडकडीत बंद

KEJ 2


जीएसटीमधील जाचक अटी रद्द करण्यासाठी व्यापार्‍यांनी पुकारलेल्या बंदमध्ये धारूरचे व्यापारी सहभागी झाले होते. सर्व व्यापार्‍यांनी बंदमध्ये सामील होऊन केंद्र सरकारचा निषेध केला. व्यापार्‍यांना जीएसटी रिटर्न सुलभतेने भरता यावे असे कायद्यात बदल घडवून आणावे, म्हणजे व्यापार्‍यांना आपल्या व्यापार वाढीत लक्ष देता येईल, अशी मागणी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी केली आहे.

Most Popular

error: Content is protected !!