बीड (रिपोर्टर) नगरपालिका प्रशासनाने भरदिवाळीत नगर रोडवरील गोरगरिबांच्या टपर्या, हातगाडे मोडून त्यांच्या रोजीरोटीवर कुर्हाड मारली मात्र दुसरीकडे भूमाफियांवर कारवाई करण्यासाठी लेखी निवेदन देऊनही याबाबत नगरपालिका मूग गिळून गप्प असल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी भरदिवाळीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झुणका भाकर आंदोलन करत निषेध नोंदवला. या वेळी आपल्या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना देण्यात आले. आंदोलनात शेख युनुस, शेख मुश्ताक, धनंजय सानप, गणेश होडशिळ, शेख अकबर, कैफ शेख, सिद्धार्थ जगताप यांच्यासह आदींचा सहभाग होता.