बीड (रिपोर्टर) बँकेतून पैसे काढून दुचाकीवरून जात असताना समोरून आलेल्या दोन भामट्याने तुमचे खाली पैसे पडले आहेत. असे म्हणत लक्ष विचलीत करत एकाने पैशाची बॅग घेवून पळ काढल्याची घटना काल दुपारी 2.15 च्या सुमारास एसबीआय बँक शाखा एसपी ऑफिस बीड समोर घडली.
गौतम भास्कर घुमरे (वय 47, रा.तिरूपती नगर, मुक्ता लॉन्सजवळ बीड) या नौकरदाराने एसबीआय बँक शाखा शिवाजीनगर एसपी ऑफिस बीड समोरील बँकेतून काल दुपारी 60 हजार रूपये काढले होते. ते पेसे त्यांनी टिफिनच्या बॅगमध्ये ठेवून ती बॅग दुचाकीच्या हॅन्डलला लटकवली. त्यावेळी समोरून आलेल्या दोन भामट्यापैकी एकाने तुमचे पैसे खाली पडले आहेत असे म्हटले, त्यानंतर घुमरे हे पैसे घेण्यासाठी खाली वाकताच दुसर्या भामट्याने बॅग घेवून पळ काढला. ही घटना भर दूपारी एसपी ऑफिससमोर घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात अज्ञात दोन भामट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक मुजावर हे करत आहेत.